Renault Discount Offer : एखादी कार आपल्याकडे असावी त्यात बसून कुठेतरी निवांत लाँग ड्राईव्हला जावे असे कितीतरी जणांचे स्वप्न असते. मात्र सध्याच्या गाड्यांच्या वाढत्या किंमती पाहता ग्राहक गाडी खरेदी करताना चार वेळा विचार करतात. पण आता गाडी घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कमी बजेटमध्ये चांगली कार तुमहाला घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरु शकते.


रेनाॅल्ट (Renault Motors) कंपनी नेहमीच नवनवीन ऑफरसह गाड्या लाँच (Launch) करत असते. ग्राहकांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी अनेक नवीन फीचर्ससह या गाड्या लाँच केल्या जातात. अशातच तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रेनॉल्ट मोटर्स इंडिया (Renault Motors India) आपल्या गाड्यांवर भरघोस डिस्काऊंट (Discount) देत आहे. या गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. ज्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपयांची बचत करु शकता.


कोणकोणत्या कारवर विशेष ऑफर?


या जून महिन्यात कंपनी क्विड (Kwid), कायगर (Kiger) आणि ट्राइबर (Triber) या गाड्यांवर कॅश डिस्काऊंट, काॅर्पोरेट बोनस, एक्सचेंज बोनस आणि लाॅयल्टी बोनस इत्यादी प्रकारच्या ऑफर देत आहे. मात्र यात प्रत्येक गाड्यांसाठी वेगळी ऑफर आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 






Renault Kwid




रेनाॅल्टच्या क्विड हॅचबॅकवर ग्राहकांना 57,000 रुपये सूट (Discount) मिळणार आहे. तर या ऑफरमध्ये 15,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 20,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस तुम्हाला मिळू शकते. 12,000 रुपयांपर्यंत काॅर्पोरेट बोनस तर 10,000 रुपये लाॅयल्टी बोनस मिळू शकतो.







Renault Triber


रेनो ट्रायबच्या 7-सीटर वर या महिन्यात 45,000 रुपयांची बचत होऊ शकते. या गाडीवर 15,000 रुपये कॅश डिस्काऊंट, 20,000 रुपये एक्स्चेंज डिस्काऊंट ऑफर मिळणार आहे. सोबतच 10,000 रुपये लॉयल्टी बोनस तुम्हाला मिळेल.


Renault Kiger


रेनाॅल्ट कायगरवर तुम्ही 65,000 रुपयांपर्यंत अगदी सहज बचत करु शकता. या ऑफरमध्ये 25,000 रुपये कॅश डिस्काऊंट, 20,000 रुपये एक्स्चेंज ऑफर तर 10,000 रुपये लाॅयल्टी बोनस आणि 12,000 रुपये कॉर्पोरेट बेनिफिट्स दिले जात आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Volkswagen Virtus GT: फोक्सवॅगन Virtus GT 1.5 चा फर्स्ट लूक, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI