Uday Samant, Pali : रत्नागिरीमध्ये शस्त्रांच कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी संदर्भात प्रकरण न्यायालयात आहे. आठ तारखेपर्यंत त्याचा निकाल लागेल, त्यानंतर कारखाना उभारण्यासाठी हालचालींना वेग येईल, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी बोलताना दिली आहे. सामंत यांनी पाली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


उदय सामंत (Uday Samant) म्हणाले,  रत्नागिरीमध्ये शस्त्राचा कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. जमिनी संदर्भातील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.आठ तारखेपर्यंत त्याचा निकाल लागेल. दरम्यान यावेळी बोलताना सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना टोला लगावलाय. जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. त्याचा राजकारण कोणी करू नये, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले. 


रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागांवर अद्याप शिवसेनेचाच दावा 


युतीच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागांवर अद्याप शिवसेनेचाच दावा आहे. याबाबत योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ट्वीट केले म्हणजे जाग त्यांची झाली असं होत नाही, असा टोलाही सामंत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना लगावला. आचारसंहितेपूर्वी राज्यातला महायुतीचा लोकसभेसाठीचा फॉर्मुला ठरेल. युती मानसन्मानाने होईल आणि शीट शेअरिंग देखील चांगलं होईल  असेही (Uday Samant) सामंत यांनी स्पष्ट केले. 


तुम्हाला देखील दररोज काहीतरी मिळावा मिळावं आणि दाखवावे म्हणून अशा गोष्टी होत असतात. थोरवे - दादा भुसे वाद तुम्ही ते जास्त मनावर घेऊ नका, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. सरकारने जी कमिटमेंट केली ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सोलापुरात मराठा समाजाने फडणवीस यांच्याविरोधात घेतलेल्या शपथेवर सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


गोव्याचा पुढील दोन दिवसात मी दौरा करणार 


गोव्यातील लोकसभेची एक जागा अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे गोव्याचा पुढील दोन दिवसात मी दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आम्ही दावा करणार आहोत . गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  रत्नागिरी - सिंधुदुर्ग या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितल्यानंतर उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रमोद सावंतांना टोला लगावलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला भाजपनं डावललं, आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली; उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ