Tussle between Nitesh Rane and Uday Samant: कोकणातील वर्चस्वावरून मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात कलगीतुरा सुरुच आहे. रत्नागिरीतील लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर आता रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टाॅक असल्याचे सांगत नितेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला टोला लगावला होता. नितेश राणेंच्या या टोल्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. भगवी शाल दिली ते बरं केलेत, भगवी शाल मी तशीच ठेवली. भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते. मला रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते तुम्हाला माहित नाही. ज्याचे जळते त्यालाच कळते, सेवाभावी संस्थेमध्यून मी मोठा झालो असल्याचे उदय सामंत म्हणाले. 

Continues below advertisement


रत्नागिरीतील लोकांनी देखील भगवे मफलर वापरावे 


चार दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी उदय सामंत यांना टोला लगावला होता. सद्या रत्नागिरीत मफलर वाले फिरत आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील लोकांनी देखील भगवे मफलर वापरावे, असा टोला राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला. वाटद खंडाळा औद्योगिक वसाहत वरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना मंत्री राणे म्हणाले की, कोकणात रोजगार आला पाहिजे. रिफायनरी आणि वाटद औद्योगिक वसाहत झाली पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात कुणीही प्रकल्प आणला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे, असे ही राणे यांनी सांगितले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण शासन देणार आल्याचे राणे यांनी शेवटी स्पष्ट केले.


इतर महत्वाच्या बातम्या