रत्नागिरी: कोकणात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या आहेत. मतदारांमध्ये उमेदवार कोण? कुणाचं पारडं जड? कोणत्या पक्षाबद्दल सहानुभूती? याच्या चर्चा जोरात रंगत आहेत.  सध्या चर्चेचे कारण म्हणजे  उदय सामंत (Uday Samant) यांचे भाऊ किरण सामंत (Kiran Samant)  यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे. या व्हायरल व्हिडीओवरून रत्नागिरी सिंधुदुर्गातून शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha ) मतदारसंघातून लोकसभेची उमेदावारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे. 


रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण? याची चर्चा सुरू असताना उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव चर्चेत आहे.  काही दिवसांपूर्वी  मुख्यमंत्री शिंदे आणि नारायण राणेंच्या भेटीत रत्नागिरी - सिंधुदुर्गबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता किरण सामंताचा  नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडी ओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याची शक्यता पुन्हा बळावली आहे. 


काय आहे व्हिडीओमध्ये? (Kiran Samant Narayan Rane Viral Video)


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने या आधीच दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून निवडणूक लढतील असं आधीच जाहीर करण्यात आलं होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri- Sindhudurga)  लोकसभा मतदारसंघावरून (Lok Sabha)  महायुतीत (Mahyuti)  वादाची शक्यता  होती.  कारण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा (BJP) डोळा होता. मात्र किरण सामंताच्या व्हायरल व्हिडीओवरून  त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. 


किंगमेकर अशी ओळख


किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना किंगमेकर म्हणून रत्नागिरीमध्ये ओळखलं जातं. लोकांची विविध कामं हाताळताना किरण सामंत दिसून येतात. बांधकाम व्यवसायामध्ये असलेले किरण सामंत यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. उच्च शिक्षित असलेले किरण सामंत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल देखील मिळवलेले आहे. सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. पडद्यामागे असलेले किरण सामंत उदय सामंत यांच्यापाठी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते. 


पाहा व्हायरल व्हिडीओ 



 


हे ही वाचा :


Kalyan Lok Sabha constituency : भाजप आणि शिंदे गटापाठोपाठ मनसेचाही कल्याण लोकसभेवर दावा, राज ठाकरेंनी तळ ठोकला