रत्नागिरी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात पहिल्याच पावसामध्ये तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. किरकोळ प्रमाणात जरी दरड कोसळली असली, तरी वाहतुकीवर याचा परिणाम नाही एकेरी मार्गे या घाटातून वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा घाट पावसाळ्यात बंद असतो. रघुवीर घाट हा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे. मात्र दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हा घाट धोकादायक झाला आहे.


रघुवीर घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली


रत्नागिरी जिल्ह्यातील रघुवीर घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे, मात्र दरडीचा धोका कायम आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी दरड कोसळत असल्याने हा घाट पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतो. सध्या रघुवीर घाट सुरु आहे. मात्र,  एकेरी मार्गाने घाटातून वाहतूक सुरु असून दरड कोसळण्याचा धोका कायम आहे.


महाड-भोर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली 


भोर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली असून सुदैवाने मोठा अपघात टळला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास महाड-भोर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली आहे. सुदैवाने या महामार्गावर कोणत्याही प्रकारचं वाहन नसल्यामुळे मोठा अपघात टळला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच पावसात दरडी कोसळत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील नडगाव आणि केबूर्ली हद्दीतील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे दरड कोसळली होती, यामध्ये काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. आज महाड-भोर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली आहे रस्त्याचे अर्धवट स्थितीतील काम याला कारणीभुत ठरत असल्याच प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येतं आहे


मंडणगड तुळशी-माहू घाट खुला, दरडीचा धोका मात्र कायम


रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील तुळशी-माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे शनिवारी दरड कोसळली. सरकारी यंत्रणांकडून रस्त्यावर आलेला दरडीचा भाग हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे, त्यामुळे बंद असलेली वाहतूक आज पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. वाहतूक सुरू करण्यात आल्याने मार्ग वाहतुकीस मोकळा झाला आहे. काल दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. मात्र प्रशासनाकडून दरड  हटविण्यात आल्याने  वाहतूक  सुरू झाली आहे. दरम्यान, दरड हटवण्यात आली असून वाहतूक सुरु करण्यात आली असली, तरी या ठिकाणी दरडीचा धोका कायम असल्याने वाहन जपून चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.