Ratnagiri Accident News: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) मागील काही दिवसांत अपघातांची (Accident) मालिका वाढून चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी हातखंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एक गंभीर अपघात घडला आहे. महामार्गाच्या कोंडमळा परिसरात उभ्या असलेल्या डम्परला मागून येणाऱ्या वाळूवरील डम्परने जोरदार धडक दिल्याने तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव अमित एकनाथ हुमणे (रा. आगवे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे असून तो कबड्डीपटू आणि महावितरणचा कर्मचारी होता.

Continues below advertisement

शनिवारी उशिरा रात्री हा भीषण अपघात घडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कबड्डीमध्ये अनेक बक्षिसे मिळवलेल्या अमित हुमणे याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. चिपळूण तालुक्यातील आगवे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Ratnagiri Accident News: अपघात नेमका कसा झाला?

चिपळूण सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डम्पर चालक सुरेश दौलत हुमणे (वय 50, रा. आगवे) हे अमित हुमणे याच्यासह आगवेहून चिपळूणकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी कोंडमळा येथील वळणाजवळ आल्यानंतर समोर एक डम्पर महामार्गावरच उभा असल्याचे दिसत होते. हा डम्पर शौकद अली (वय 50, रा. जयगड, रत्नागिरी) याने कोणताही इशारा फलक, इंडिकेटर, रिफ्लेक्टर किंवा इतर सुरक्षात्मक उपाय न लावता थेट डाव्या लेनमध्ये उभा केला होता. वेगाने येणाऱ्या सुरेश हुमणे यांच्या डम्परला वाहन अंधारात नजरेस न पडल्याने त्यांच्या वाहनाची उभ्या डम्परला जबरदस्त धडक बसली.

Continues below advertisement

Ratnagiri Accident News: अमित हुमणेचा जागीच मृत्यू, चालक गंभीर

धडक इतकी भयानक होती की केबिनमध्ये बसलेल्या अमित हुमणे याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश हुमणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षणात उभा डम्पर चुकीच्या पद्धतीने उभा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चालक शौकद अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावर्डे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dhule Accident News: विहिरीतून परी अन् खुशीचा मृतदेह काढताच कुटुंबाचा आक्रोश; चिमुरड्या मुलींसोबत घडलेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला

Mohol Crime: सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय, सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल, सोलापूरच्या मोहोळमध्ये खळबळ