Solapur Crime News : सासरच्या मंडळानी दिलेल्या त्रासाला कंटाळून मोहोळ (Mohol) येथील एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वाती जयंत थोरात असे मृत 33 वर्षीय महिलेचे नाव आहे. स्वाती हिचा मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत 2015 साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतरपासून सासरची मंडळी हे वारंवार तिला त्रास देतं होते. काही दिवसापासून तीच्या चारित्र्यवर देखील संशय घेण्यात येत होता. तसेच माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये असा तगदा देखील लावण्यात आल्याचा आरोप (Solapur Crime News) मृत स्वातीच्या कुटुंबियांनी केला. याचं त्रासाला कंटाळून स्वातीहिने गळफास (Solapur Crime) घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वातीचे पती जयंत थोरात, सासरे चंद्रकांत थोरात, सासू सिंधुमती थोरात, नणंद आश्विनी पाटील या सर्वांच्या विरोधात मोहोळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

Continues below advertisement

Beed Crime : जमिनीच्या किरकोळ वादातून आई-मुलाला गावगुंडाकडून बेदम मारहाण

जमिनीच्या किरकोळ वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगावी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडानी भर रस्त्यात अमानुष मारहाणीत गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.अमानुष मारण्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केदार कुटुंबाने केली आहे. केदार कुटुंब दहशतीखाली असून जीवे मारण्याची धमकी दिली.

Continues below advertisement

5 डिसेंबर रोजी झालेला मारण्याची तक्रार पोलीस स्टेशनला का केली म्हणून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली आहे. पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली मात्र आरोपीवर कारवाई केली असती तर पुन्हा ही अशी घटना घडली नसती..या मारहाणीची आपबीती विजयमाला केदार यांनी सांगितली. तसेच जीविताला धोका असल्याचे सांगितलेय. बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.केज पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एक गंभीर घटना उघडकेस आली आहे. अगोदरच आरोपींना समज दिली असती कारवाई केली असती तर अशी घटना घडली नसती.

Chhatrapati Sambhajinagar: लग्न समारंभातून पैसे आणि मोबाईल असलेली पर्स लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

छत्रपती संभाजीनगरात लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात एका चोरट्याने पैसे आणि मोबाईल असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुतगिरणी चौक परिसरातील जानकी बँक्वेट हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात एका चोरट्याने अत्यंत शिताफीने ही चोरी केली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी हर्ष रविंद्र भावसार यांनी तक्रार दिली असून त्यांच्या आईची पर्स अज्ञात चोरट्याने हॉलमध्ये प्रवेश करून चोरून नेली. या पर्समध्ये दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 17 हजारांचा मुद्देमाल होता. घटनेनंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी: छोटे भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे निर्देश; राज्यातील 60 लाख मालमत्ताधारकांसह तीन कोटी नागरिकांना लाभ, राज्य सरकारचे निर्देश