Ratnagiri Veda Sarfare News रत्नागिरी: साधारणपणे दोन वर्षाचं बाळ नीट चालत देखील नाही. पण, रत्नागिरीतील एक वर्ष नऊ महिने वय असलेल्या चिमुकलीच्या पोहण्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. वेदा सरफरे (Veda Sarfare Swimmer) असं तिचं नाव आहे.

Continues below advertisement

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही पोहताना. नऊ महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरूवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहचला आहे. 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेंकदात पूर्ण करत वेदा हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरण पटू बनली आहे. (Ratnagiri Veda Sarfare News)

नऊ महिन्याची हि चिमुरडी खरं तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती. वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे.रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती. त्यावेळी तिच्या कंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पहायची.एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो. (Veda Sarfare News)

Continues below advertisement

वेदानं जलतरणामध्ये देशाचं नेतृत्व करावं, आई-वडिलांची इच्छा- (Ratnagiri Veda Sarfare News)

वेदानं जलतरणामध्ये देशाचं नेतृत्व करावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा आहे. तिनं ऑलम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून द्यावं अशी इच्छा तिच्या बाबांची आहे. सध्या वेदा बिनधास्तपणे पोहोतेय. तिची एकंदरीत तयारी पाहता भविष्यात वेदा देशासाठी नक्की खेळेल असा विश्वास व्यक्त करायला काहीच हरकत नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: