रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीला (Refinery) स्थानिकांचा विरोध कायम आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावातमधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु,यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय.  


राजापूर तालुक्यातील गोवळ गावात आज सर्व्हे कण्यात येणार आहे. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.  


रिफायनरी विरोधक आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु, कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांकडून फौज फाटा तैनात करण्यात आलाय. शिवाय  आंदोलकांची भूमिका पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे. सर्व्हेला परवानगी नसताना कशाप्रकारे काम करता? असा सवाल स्थानिकांनी पोलिसांना केलाय. यावरूनच पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.    


सध्या असलेली आंदोलकांची संख्या हळूहळू वाढू शकते. कारण आजूबाजूच्या गावातील लोक जमा होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी जादा कुमक मागवली आहे.  


आंदोलन मागे
दरम्यान, रिफायनरी विरोधकांनी ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण या विरोधात घेतलेला आंदोलनाचा निर्णय सध्या तात्पुरता मागे घेतलेला आहे. ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण करणाऱ्या कंपनीने  राजापूर तालुक्यातील गोवळ गावच्या साड्यावर झालेला विरोध पाहता काम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिकांनी देखील सध्या आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या ठिकाणी असलेली पोलीस यंत्रणा आणि कंपनीचे सर्व कर्मचारी माघारी फिरल्यानंतर आंदोलक देखील माघारी फिरणार आहेत. 


आंदोलकांचा इशारा
यापुढे असा प्रयत्न झाल्यास, ग्रामपंचायत किंवा प्रशासनाची याला परवानगी नसल्यास आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसणार असा  इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. 


महिला जखमी
आंदोलनादरम्यान एक महिला जखमी झाली असून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


महत्वाच्या बातम्या


Konkan Refinery Project : उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रीपद आल्यानंतर कोकणातील रिफायनरी समर्थक सक्रिय! 


Nanar Refinery: फडणवीस सत्तेत आल्याने नाणार येथील रिफायनरीला चालना मिळणार?