Mumbai Goa Highway Kashedi Tunnel : कोकण (Kokan) आणि गोव्यात (Goa) जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.  शिमगोत्सवासाठी (Holi 2024) कोकणात (Kokan) जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग सुरु करण्यात आल्याने कोकणवासियांसाठी चांगली बातमी आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा कोकणात येण्यासाठीचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू करण्यात आला आहे.


कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग खुला 


शिमगोत्सवासाठी (Shimgotsav) कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणारी वाहने या बोगद्याचा वापर करू शकतात. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी, दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे. शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कशेडी बोगदा हा होळीपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.


दुतर्फा वाहतुकीसाठी मार्चअखेरपर्यंत सुरु होणार


कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्चअखेरपर्यत खुला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गणेशोत्सवात सुरू झालेल्या एकेरी मार्गीकीच्या वाहतुकीला अवघ्या 18 दिवसानंतर लागलेला ब्रेक आज मितीसही कायम असून बोगदा खुला होण्याची वाहन चालकांना प्रतीक्षा लागली आहे. मार्च अखेरपर्यंत बोगद्यातील दुतर्फ वाहतूक खुली होण्याचे संकेत मिळत आहेत.राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून बोगद्यातील प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे.यामुळे पुन्हा दोन्ही मार्गिकेतून वाहन चालकांचा प्रवास सुसाट होणार आहे.


चार वर्षांची प्रतीक्षा संपणार!


वर्ष 2019 चे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच डिसेंबर 2024 ही शेवटची डेडलाईन चौपदरीकरण पूर्ण करण्याची असून कंपनी ठेकेदार आणि संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


महामार्ग की मृत्यूचा सापळा? मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच दोन हजार निष्पाप जीवांचा बळी; सरकारनेच दिली जाहीर कबुली