रत्नागिरी : राज्यभरातल्या एसटीची दुरावस्था दाखवणारे व्हिडीओ गेल्या काही दिवसांत समोर आले आहेत. कुठे एसटीला गळती लागली आहे, तर कुठे चालक हातात छत्री घेऊन गाडी चालवत असल्याचं धक्कादायक वास्तव काही व्हिडीओंमधून दिसून आलं आहे. त्यामुळे एसटीच्या दुरावस्थेवरती अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. यात कमी म्हणून की, काय रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख एसटी आगारातील पुणे आणि अर्नाळा या मार्गावर धावणाऱ्या एसटीचा प्रवास सुरक्षित नसल्याचा व्हिडीओ अमित आपटे या एसटी चालकाने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. 


राज्यातील एसटी गाड्यांच्या दुरावस्थेचे व्हिडीओ व्हायरल


एसटीच्या दुरावस्थेचे व्हिडीओ सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, कधी चालकच एसटीतून प्रवास धोकादायक असल्याचं प्रवाशांना सांगत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटीचा प्रवास आणि दुरावस्था याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील विविध भागांतील एसटीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर यावर जोरात चर्चा होताना दिसून येत आहे.


अहवालवर संबंधितांवर कारवाई करी, अधिकाऱ्यांचं आश्वासन


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चालकाचे निलंबन करत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित झाल्यानंतर कारवाई करु, असं आश्वासन रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर प्रवाशांनी देखील एसटीच्या संपूर्ण कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एसटी प्रवासात सुधारणेची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे.


एसटी गाड्यांची दुरावस्थेवर प्रवाशांची नाराजी


सुरक्षित ग्रामीण वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून एसटीकडे पाहिलं जातं. दररोज लाखो प्रवासी या हजारो एसटीमधून प्रवास करत असतात. पण, मागील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या एसटी गाड्यांची दुरावस्था पाहात त्याबद्दल प्रवासी नाराजी देखील व्यक्त करत आहेत. एसटीमध्ये नवीन गाड्या दाखल होत आहेत. प्रवाशांसाठी नवीन योजना देखील दिल्या जात आहेत. पण, हे करत असताना जुन्या गाड्यांची देखभाल आणि त्यातून होणारा प्रवास किती सुरक्षित आहे? याकडे देखील जातीने लक्ष देणे गरजेचं आहे.


पाहा व्हिडीओ :


Lalpari Condition Special Report : राज्यात लालपरीची दुरावस्था, लालपरीच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?



महत्त्वाच्या इतर बातम्या


ST Bus : बसमध्ये 62 प्रवाशी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 100 फूट लांब पडला; पुढे जे घडलं