MSRTC Bus Shocking Video : मागील काही दिवसांपासून एसटी बसची (ST Bus) दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. तीन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील अहेरी आगारातील लालपरीचा छप्पर फाटलेल्या अवस्थेत धावणाऱ्या बसचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील एका एसटी बसचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एसटी बसचा चालक एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्‍या हाताने काचेवरील वायपर फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्याने चालकावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. 


एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, याच एसटी बसची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांत समोर आले आहे. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या अशाच एका एसटी बसचा धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एसटी बसेसचे वायपर काम करत नसल्याने ड्रायव्हर हाताने काच साफ करत एसटी चालवत आहे. अशा पद्धतीने धोकादायक एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा व्हिडीओ काढून एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी बसची दूरवस्था समोर आली आहे. 


आठवड्याभरात चार व्हिडीओ व्हायरल! 


पहिला व्हिडीओ : 27 जुलै रोजी व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील होता. या व्हिडीओमध्ये बसचे छत अर्धे तुटले आहे. तरीही या बसचा चालक ही बस वेगाने चालवत आहे. या एसटीच्या पुढे असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. 




दुसरा व्हिडीओ : 28 जुलै रोजी व्हायरल झाला. हा व्हिडीओ नांदेड जिल्ह्यातील होता. ज्यात देगलूर मुक्रमाबाद जाणाऱ्या बसचा पत्रा पावसाच्या पाण्यामुळे गळत होता. यामुळे एसटी बसमध्ये पाणीच पाणी झाले. अशावेळी प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागला. दरम्यान, यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. 




तिसरा व्हिडीओ : हा व्हिडीओ देखील 28 जुलै रोजी व्हायरल झाला. हा व्हिडीओ गडचिरोली जिल्ह्यातील होता. पावसाच्या पाण्यामुळे पूर आल्याने अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी निघालेल्या बसचा वायपर बंद पडला. त्यामुळे बस चालकाला एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्‍या हाताने वायपर चालवण्याची वेळ आली. 




चौथा व्हिडिओ : आज (30 जुलै) रोजी नांदेड जिल्ह्यातून समोर आला आहे. देगलूर येथील हा व्हिडीओ असून, ज्यात एसटी बसेसचे वायपर काम करत नसल्याने ड्रायव्हर हाताने काच साफ करत एसटी चालवत आहे. तर एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्‍या हाताने वायपर फिरवणाऱ्या या बस चालकाचा देखील व्हिडीओ व्हायरल होत आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


MSRTC Bus Running With Broken Rooftop : छत तुटलं, तरीही एसटी नाही थांबली, गडचिरोलीमधील भरधाव वेगात धावणाऱ्या एसटीचा व्हिडीओ व्हायरल