रत्नागिरी : चिपळूण गुहागर (Chiplun Guhaghar) मार्गावर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे.  गाडीचा टायर फुटून टेम्पो वळताना पलटी झाला. या घटनेत  दोन महिला कामगारांचा गाडीत चिरडून मृत्यू झाला आहे.  गुहागर चिपळूण मार्गावरील शृंगारतळी येथील वळणावर टेम्पो पलटी झाला.

  


घरावरील स्लॅब टाकण्यासाठी मशिनरी आणि कामगार यांना घेऊन जात असताना टायर फुटून अपघात  झाला .  गुहागर पोलीस घटना स्थळी रवाना झाला आहे.  टेम्पोमध्ये आणखी काहीजण अडकल्याची भीती आहे.  दरम्यान गाडीमध्ये नेमके किती जण होते? कुठुन आले होते? या विषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  सामान अंगावर पडल्याने महिलांचा मृत्यू झाला आहे. 


महिलांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ


दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच जवळील गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अपघाताची  नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.