Maharashtra Political Crisis : राज्यासह देशाच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. ज्या बंडामुळे एक सरकार कोसळलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटी (Guwahati) गाठलं. शिंदेंसह 40 आमदार गुवाहाटीत मुक्कामी होते. दरम्यान, शिंदेच्या बंडात ठाकरे गटाचा आणखी एक आमदार सामील होण्यास तयार होता, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे.शिंदेंसोबत इतर आमदार गुवाहाटीला असताना भास्कर जाधवही तिकडे जाण्याच्या तयारीत होते, असा मोठा दावा योगेश कदम यांनी केला आहे.
'भास्कर जाधव गुवाहाटीला जायला तयार होते'
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्रयोगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते. ही गोष्ट सन्माननीय शिंदे साहेब, उदय सामंत साहेब आणि मला माहिती आहे. तेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारलं होतं की, काय करायचं भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही मांडली होती.
योगेश कदम यांचा मोठा दावा
भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधताना योगेश कदम यांनी म्हटलं की, 'स्वतःचं खरं कसं आहे हे रेटून न्यायचं आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त त्यांना काही येत नाही. शिवसेना-भाजप अशी मजबूत पकड जेव्हा बसत होती, तेव्हाच त्यांना घ्यायला नकार दिला होता. तेव्हाच ते यायला तयार होते, पण मला वाटत नाही आता कोणता पक्ष त्यांना घेईल.'
'उदय सामंत, मी आणि रामदास कदम यांनी विरोध दर्शवला'
शिंदे गटाचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी सांगितलं आहे की, आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. पण उदय सामंत, मी आणि रामदास कदम यांनी त्यांना त्यावेळी विरोध दर्शवला. त्यांना जर आता पक्षात यायचं असेल तर वरिष्ठ निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य असेल. शिवाय रामदास कदम यांनी किंवा आम्ही जी नाराजी बोलून दाखवली ती किमान आता संपली आहे. त्यावरती आता अधिक बोलणे नको, अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : भास्कर जाधव यांना कोणता पक्ष घेईल असं वाटतं नाही
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Raj Thackeray : शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच; राज ठाकरेंचा मोठा दावा