Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे वयाच्या 86 वर्षी निधन झालं. आज (गुरूवारी) दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. रतन टाटा यांचे स्वीय सहाय्यक शांतनू नायडू (Shantanu Naidu) याने देखील सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रतन टाटांच्या जाण्यानं मैत्रीत पोकळी निर्माण झाली, असं शांतनूने सांगितले.
शांतनू नेमकं काय म्हणाला? (Shantanu Naidu On Ratan Tata)
रतन टाटांसोबतच्या मैत्रीने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दु:ख ही आहे. गुडबाय, माय लाईटहाऊलस…, अशी भावूक पोस्ट शांतनूने केली आहे.
कोण आहे शांतनू नायडू?
शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पुणे येथे झाला. खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. शांतनूच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे. शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. गुडफेलोज या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.
रतन टाटा यांची कारकीर्द-
- जन्म - 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष
- 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू
1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं
- चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली
- 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)
- एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली
- 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली
- 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला
- मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी
- नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन
- रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.