मुंबई : उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी एवं कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली होती. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
देशातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 93 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक
महाराष्ट्रातील 10 पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहेत.
शौर्य पदक – मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे
विशिष्ठ सेवा पदक – अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक)
गुणवत्ता सेवा पदक
धनंजय कुलकर्णी
नंदकुमार ठाकूर
अतुल पाटील
नंदकिशोर मोरे
स्टीव्हन मॅथ्यूस अॅन्थोनी
निशिकांत भुजबळ
चंद्रशेखर सावंत
मिलिंद तोतरे
सदानंद मानकर
मुकुंद पवार
संभाजी सावंत
गजानन काबदुले
कयुमरेज इराणी
निलिमा अराज
इंद्रजित करळे
गौतम पातरे
सुभाष भुजंग
सुधीर दळवी
किसन गायकवाड
जमील सय्यद
मधुकर चौगुले
भिकन सोनार
राजू आवताडे
शशिकांत लोखंडे
अशफाक अली चिश्तिया
वसंत तराटे
रविंद्र नुल्ले
महेबूबअली सय्यद
साहेबराव राठोड
दशरथ चिंचकर
लक्ष्मण टेंभूर्णे
बटुकलाल पांडे
विष्णू गोसावी
प्रदीप जांभळे
चंद्रकांत पाटील
भानुदास जाधव
नितीन मालाप
रमेश शिंगाटे
बाबुराव बिर्हाडे
संजय वायचळे
महाराष्ट्रातील 54 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2020 05:37 PM (IST)
देशाभरातील उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरवण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक प्राप्त झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -