सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड कोटीच्या विम्यासाठी एका व्यक्तीसह स्विफ्ट गाडी जाळल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी सुमित मोरेसह सुमित मोरे पाच आरोपींना सातारा पोलिसांनी बेढ्या ठोकल्या आहेत.


सातारा जिल्ह्यातल्या बोधेवाडी घाटात कार आणि मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडलं होतं. या घटनेत सुमित मोरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं होतं. मात्र तपासाअंती सुमित मोरेनेच बनाव रचून आपला मित्र तानाजी आवळेची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

दोन दिवसापूर्वी उकिर्डे घाटात पोलिसांना संपूर्ण जळालेली गाडी सापडली होती. या गाडीच्या स्टेअरिंगवर एक मृतदेही देखील पोलिसांना आढळला होता. गाडीच्या चेसीनंबरवरुन गाडीच्या मालकाचा पत्ता मिळाला. त्यानुसार घरातील सर्वांना बोलावून घेतले. याच तपासातून मृतदेहाची ओळख पटली. गाडीने पेट घेतला आणि त्यात गाडीचा चालकाचा मृत्यू झाला अशी नोंद पोलीस ठाण्याच्या डायरीत झाली आहे. त्यानंतर पोस्टमार्टम करुन मृतदेह मोरे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.



असा होता घटनाक्रम

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याती महिमानगड येथील मूळचा राहणारा सुमित मोरे हा आई वडिल आणि कुटुंबियांसोबत मुंबईतील सायन भागातील काळा किल्ला परिसरात राहत होता. व्यायामावेळी लागणारे प्रोटिन पावडर बनवने हा त्याचा व्यवसाय. या व्यवसायामुळे सुमारे 50 लाखाचे कर्ज त्याच्या अंगावर होते. त्यामुळे त्याने मुंबईत आयसीआयसीआय कंपनीचा दीड कोटी रुपयांचा विमा उतरवला.

‘आपण मेलो तर दिड कोटी रुपये मिळणार, मग जर माझ्या मृत्यूचा खोटा दाखलाच तयार केला तर’ याच उद्देशाना त्याने एक प्लॅन बनवला. तो त्याने आपल्या वडिल आणि त्याच्या दोन भावांना सांगितला. त्यानुसार 20 जानेवारीला सुमित मुंबईतून साताऱ्यात आला. त्याने माण तालुक्यातील उकिर्डे गावातील मित्र तानाजी आवळेला बोलावून घेतले. आपल्याला एका महत्वाच्या कामासाठी जायचे असल्याचे असे म्हणत त्याने स्वता:च्या गाडीतून त्याला घेऊन गेला.

तुझे कपडे खराब आहेत, असे म्हणत त्याने तानाजीला स्वता:चे कपडे त्याला घालायला दिले. त्यानंतर बहाणा तयार करुन त्याला सुनसान जागी गाडीतून खाली उतरवले. सुमितने तानाजीच्या डोक्यात स्टंप मारुन त्याने त्याला बेशुध्द केले. बेशुध्द तानाजीला सुमारे चार तास गाडीतून फिरवत अखेर बुधघाटात आणले. त्यानंतर बेशुध्द तानाजीला स्टेरींगवर बसवच गाडीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पेटत असलेला तानाजी शुध्दीवर आला आणि तो स्टेअरिंगवरुन खाली उतरला, हे पाहून सुमितने त्याच्या अंगावर आणखी पेट्रोल ओतले. यात त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर वाठार पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून तुमच्या मलाचा मृत्यू झाल्यचे सांगून सुमितचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. सर्वकाही मनासारख झाल होत, परंतू पोलिसांच्या डोक्यात कुठेतरी पाल चुकचुकत होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता हा बनाव असल्याचे उघड झाले. लगेचच पोलिसांनी सुमितला अटक केली पकडले. चौकशीनंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे वडिल, दोन भाऊ आणि फलटण मधील एक मित्र अशा सर्वांनाच बेड्या ठोकल्या.