Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहचली असून भाजपकडूनही (BJP) जोरदार प्रचार सुरू आहे. तर, दुसरीकडे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात (Ram Mandir Inauguration) शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नाहीये, असा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे. दरम्यान शंकराचार्यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 


शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी काय योगदान?


नारायणा राणे म्हणाले, राम मंदिर (Ram Mandir) एवढ्या वर्षांनंतर होत आहे, याचे त्यांना कौतुक नाही. हे आत्तापर्यंत कोणीही करु शकले नाही. हा विषय कोणीही घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला. मंदिर होत आहे तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? समाधान आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे? ते सांगावे, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. 


शंकराचार्य मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षाला राजकीय दृष्ट्या पाहात आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीने होत नाही. ते धार्मिक दृष्टीने होत आहे. राम आमचा देव आहे. त्याच्यासाठी हे सर्व सुरु आहे. रामाची मूर्ती जाग्यावर येत आहे. आम्हाला दर्शन घेता येणार आहे. याचे आम्हाला समाधान आहे, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.  


शंकराचार्य काय म्हणाले होते?


स्वामी निश्चलानंद म्हणाले, 'जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही. मी जनतेला भडकावत नाही, पण जनता आमचा शब्द पाळते. जनमत आमच्या पाठीशी आहे, धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे. ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये, असेही शंकराचार्यांनी सूचित केले. खऱ्या-खोट्या शंकराचार्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल हे खोटे नसतात. मग शंकराचार्यांची पदे यापेक्षा वाईट आहेत का? ते पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर सत्ता गाजवण्याचे पद आमचे आहे.


पीएम मोदी आणि सीएम योगीबद्दल शंकराचार्य काय म्हणाले?


पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत शंकराचार्य म्हणाले, 'मी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ओळखतो. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीही ते माझ्याकडे आले होते आणि माझ्याकडून किमान चुका व्हाव्यात म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यास सांगितले होते आणि आता ते एवढी मोठी चूक करणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ram Mandir Inauguration : विधीवत प्राणप्रतिष्ठा न झाल्यास मूर्तीमध्ये भूत-प्रेतांचा वास; शंकराचार्य स्वामी सरस्वतींचा राम मंदिर उद्घाटनावर आक्षेप