जयपुर: राजस्थानमधील चूरू जिल्ह्यातील सालासर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी (20ऑक्टोबर) एक धक्कादायक  घटना घडली आहे. शाळेमधील एका शिक्षकाने 7 वी इयत्तेमध्ये असणाऱ्या एका मुलाला बेदम मारले. शिक्षकाने मारल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल पोलिस अधिकारी संदीप विश्नोईने यांनी माहिती दिली आहे.   


पोलीस अधिकारी संदीप विश्नोईने यांनी सांगितले की, कोलासर गावामध्ये राहिवासी 13 वर्षाचा गणेश एका खाजगी शाळेत 7 वी इयत्तेमध्ये शिकत होता. त्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने त्याला बेदम मारले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊ गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


शिक्षकाला अटक 
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले, विद्यार्थ्याच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे शिक्षक मनोजला (35) अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.  शिक्षकाच्या विरोधात आयपीएस कलम  302 (हत्या) आणि बालन्याय अधिनियम कलम 75 नुसार तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर त्या मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. 


ब्राझीलमध्ये कोरोनाने झालेल्या मृत्यूसंदर्भात राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्यावर हत्येचा खटला चालवण्याची शिफारस : सीनेट रिपोर्ट


शिक्षक निलंबित- शिक्षणमंत्री
राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा  यांनी ट्वीट केले, 'चुरूच्या सालासरमधील कोलासर गावामध्ये आज एका खाजगी शाळेत शिक्षकाने मारल्यामुळे 7 वी इयत्तेमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समजली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. या संबंधित तापास पूर्ण होईपर्यंत शिक्षकाला शाळेमधून निलंबित करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.  '


प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आग्र्यात पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं!


Lakhimpur kheri News: सर्वोच्च न्यायालयाकडून लखीमपूर हिंसाचारावर 26 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी स्थगित, कोर्टात काय झालं?


आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक