Priyanka Gandhi Detained: यूपीच्या आग्रामध्ये वाल्मिकी समाजातील एका युवकाचा कथितपणे पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. यानंतर तरुणाच्या कुटुंबाला भेटायला जात असलेल्या . काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना आग्रा येथील एक्सप्रेस वेवर ताब्यात घेण्यात आले आहे. अरुण कुमार नावाच्या सफाई कर्मचाऱ्याचा पोलीस कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. वाल्मिकी समाजाशी संबंधित अरुण कुमारला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत पण या महिन्याच्या सुरुवातीपासून यूपीचं राजकीय वातावरण तापलं आहे.
आग्र्याला जाण्यापासून रोखल्याबद्दल, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की "पोलिसांची परिस्थितीच अशी झाली आहे की ते काहीही बोलू शकत नाहीत. त्यांच्या अधिकाऱ्यांनाही माहित आहे की हे चुकीचे आहे आणि त्यामागे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. प्रत्येक ठिकाणी कलम 144 असल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, "अरुण वाल्मिकीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय न्याय मागत आहेत. मला कुटुंबाची भेट घ्यायची आहे. यूपी सरकारला कशाची भीती वाटते? मला का थांबवले जात आहे? "
पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि पीडितेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे : प्रियंका
या दरम्यान, प्रियंका गांधी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, मला पीडितेच्या कुटुंबीयांचे दुःख शेअर करण्यासाठी आग्र्याला जायचे आहे. शेवटी, सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हालचालीला का घाबरत आहे? तत्पूर्वी, प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले होते, "पोलीस कोठडीत एखाद्याला मारहाण करणे कुठला न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरुण वाल्मीकीचा मृत्यू झाल्याची घटना निंदनीय आहे. भगवान वाल्मिकी जयंतीच्या दिवशी, यूपी सरकारने त्यांच्या संदेशांविरोधात कारवाई केली आहे. उच्चस्तरीय तपास, पोलिसांवर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी.