Raigad : रविवारी रायगडावरून (Raigad) ढगफुटीनंतर कोसळणाऱ्या धबधब्यांनी (Waterfall) रौद्ररूप धारण केले होते. यादरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी (Raigadwadi) गावातील एक तरुण मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. यामुळे रायगडमध्ये एकच खळबळ उडाली होती. मनोज खोपकर (Manoj Khopkar) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह आता चार दिवसांनतर सापडला असून शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. 


रविवारी (दि. 07) दुपारनंतर किल्ले रायगड (Raigad Killa) परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पर्यटक (Tourist) रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले. महादरवाज्यातून (Mahadarvaja) मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येत होते. यामुळे पर्यटक मध्येच अडकले होते. पहिल्यांदाच अशा प्रकारे धबधबासदृश्य पाणी रायगडाच्या महादरवाज्यातून कोसळत असल्याचे दिसून आले. शेवटी प्रशासनाच्या पुढाकाराने पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. 


तरुणाचा मृतदेह चार दिवसांनंतर सापडला


याच दरम्यान, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर (Manoj Khopkar) हा आपल्या मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. तो मुंबईहून आपल्या मित्रांसह गावी आला होता. एनडीआरएफच्या (NDRF) पथकाकडून मनोज खोपकरचा शोध सुरु होता. चार दिवसानंतर त्या मृतदेह आढळून आला. त्यामुळे शोधमोहीम आता थांबवण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद 


रायगड परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड (Raigad Rain) जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाकडून तातडीने हा निर्णय जारी करण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत रायगड पर्यटकांसाठी (Raigad Closed For Tourists) बंद असणार आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजाचा मार्ग बॅरीकेटिंग टाकून बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ले परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajanta Saptakund waterfall: अजिंठा लेणी जवळील सप्तकुंड धबधब्यावर रील्स, सेल्फी काढण्यास बंदी, पर्यटकांना पोलिसांचा कडक इशारा


Pune News: भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय, पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद, 30 सप्टेंबरपर्यंत नो-एन्ट्री