Uddhav Thackeray in Panvel : "गद्दाराच्या नायकाला विचारा मी असं काय दिलं नव्हतं? सर्व दिलं तरी पाठित वार केला. याने दाढी खावण्यासाठी देखील लोकं ठेवलेले असतील इतका पैसा आहे. घोड्यावर बसलो म्हणजे यांना वाटतं घोडा माझा, मात्र घोडा कसा लाथ मारतो ते बघा", अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. पनवेल येथे ठाकरेंच्या शिवसेनेची जनसंवाद सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 


पीएम केअर फंडचे लाखो रुपये गेले कुठे? 


उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपकडे प्रचंड पैसा आहे, पीएम केअर फंडचे लाखो रुपये गेले कुठे? कोरोना काळात तो निर्माण केला, राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी तिकडे पैसे दिले. त्या फंडाचा बाप कोण आहे? आमचं सरकार आल्यावर तो फंड आमच्याकडे येणार आहे की नाही? असे सवालही उद्धव ठाकरे यांनी केले. उगाच कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि अजित पवार तिकडे गेले.  सीतारमण यांनी आरोप केला आणि अशोक चव्हाण तिकडे गेले, असंही ठाकरेंनी नमूद केलं. 


इथल्या खासदाराला आडवा करायचाच


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही जागा आपल्याला जिंकावीच लागेल. एकाबाजूला छत्रपतींचे जन्मस्थान आणि दिसरीकडे राजधानी आहे. आपला हक्काचा भगवा फडकणार नाही तर कोणता फडकणार ? कदाचित भाजपचं सरकार आलं तर ही शेवटी निवडणूक ठरेल. पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणतायत, ते केंद्रवाले पण म्हणतायत पुन्हा येईन पण काही येत नाहीत. संकटात साथ देणाऱ्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. इथल्या खासदाराला आडवा करायचाच. पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत, दुकान चालवणारी ही लोकं आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. 


काँग्रेसच्या काळातील योजना नामांतर केल्या


 देशाला कौतुक वाटेल असं काम कोव्हिडमध्ये आपण केलं.  लसीकरण, चाचण्यात वाढ केली होती. तेव्हा गद्दाराला कळलं नाही ग्रामीण रुग्णालय नाही. फक्त स्वत:चा विचार केला. 10 वर्षात यांनी केलं काय? भाजप तडीपार करणारच, मी नोटीस दिलीय, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचं आहे. काँग्रेसच्या काळातील योजना नामांतर केल्या. तुमच्या नेत्यांची नावं देता, जुमल्याचं नाव मोदी गॅरंटी झालं आहे, असेही ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Majha Maharashtra Majha Vision 2024 : गद्दारांच्या सरकारमध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली : आदित्य ठाकरे