Raigad News : मागच्या वेळेस कोणी कोणाचे पाय धरले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.  आता हेच अनंत गीते (Anant Geete) राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरतात. अनंत गीतेंचे लोकसभेला मला आव्हान आहे, असे मी मानतच नाही, घोडा आणि  मैदान आता जवळच आहेत, असा खरपूर समाचार सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा घेतला आहे.


रायगड लोकसभेचे दावेदार असणारे सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते (Anant Geete) यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे. नुकतेच माणगाव येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता.


सुनील तटकरेंनी आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी - अनंत गीते


सुनील तटकरे हा विश्वास घातकी माणूस असून ते जन्मापासूनच विश्वासघातकी आहेत. ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठीत खंजीर खुपसू शकतात तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे काय? असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच हिंमत असेल तर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्या विरोधात निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवून दाखवावी, मग त्यांची काय अवस्था होईल ते बघा, असे आव्हान अनंत गीतेंनी सुनील तटकरेंना दिले होते. 


घोडा मैदान आता जवळच - सुनील तटकरे 


अनंत गीते यांच्या टिकेवर सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुनील तटकरे म्हणाले की,  उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावर फक्त शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादाने बसले होते. मागच्या वेळेस कोणी कोणाचे पाय धरले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.  आता हेच अनंत गीते राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरतात. महायुतीने ही जागा राष्ट्रवादी (NCP) पक्षाने लढवावी असे आदेश दिल्यास निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे. अनंत गीतेंचे लोकसभेला मला आव्हान आहे, असे मी मानतच नाही, घोडा मैदान आता जवळच आहेत, असा खरपूस समाचार सुनील तटकरे यांनी घेतला आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या


Anil Deshmukh: चांदीवाल आयोगानं 'क्लिन चीट' दिल्यानेच गृहमंत्री फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवला; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप


Sanjay Raut : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा, संजय राऊतांचं वक्तव्य