Majha Maharashtra Majha Vision 2024 : आता गॅरंटी या शब्दाचा अपमान होतोय, नाना पटोलेंचा भाजपला टोला

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates : मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध पक्षाच्या बड्या नेत्यांचं महाराष्ट्रापती व्हिजन काय, हे तुम्ही आज दिवसभर पाहू शकाल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2024 06:20 PM
Majha Maharashtra Majha Vision : महिला आरक्षणावर मोदी खोटं बोलतात, नाना पटोलेंचा आरोप

एकीकडे महिला बील आणलं, महिला आरक्षणाचं विधेयक आणलं आणि ते 2029 रोजी लागू केलं जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे आरक्षण जनगणनेच्या आधारे आणण्यात येईल असं ते म्हणाले. पण त्यासाठी जनगणना तरी झाली पाहिजे. देशात जनगणनाच झाली नसल्याने ते देशाला फसवण्याचं काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. 

Majha Maharashtra Majha Vision : आता भाजप नव्हे तर मोदी सरकार, गॅरंटी या शब्दाचाही अपमान होतोय, नाना पटोलेंचा टोला

सध्याचं सरकार हे भाजप पक्षाचं नाही तर मोदी या एका व्यक्तीचं आहे, त्यामुळेच त्याला मोदी सरकार म्हटलं जातंय. त्यामुळेच आता गॅरंटी या शब्दाचा अपमान होतोय असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. 

Majha Maharashtra Majha Vision 2024 : महाराष्ट्र कसा चालेल ही नोट दिल्लीकडून येते: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र कसा चालेल ही नोट दिल्लीकडून येते. महाराष्ट्र गुजरातसाठी चालतोय, सगळं उलटं सुरु आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत.हे सगळं इगो इश्यू म्हणून पाठवले जात आहेत


महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय परिस्थिती बिघड़ली आहे. राजकीय परिस्थितीचा चोथा झाला असून शिवसेना राष्ट्रवादी फोडली. घटनाबाह्य सरकारने 30 शहरात कब्जा केला. 

Majha Maharashtra Majha Vision 2024 : गद्दारांच्या सरकारमध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली : आदित्य ठाकरे

जेव्हा आमदार गोळीबार करायला लागतो, माजी नगरसेवकावर गोळीबार होतो, बिल्डिंगच्या व्हॉट्सअॅपवर वाद होऊन त्यावर भांडण होतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती, तेच व्हिजन घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

Majha Maharashtra Majha Vision 2024 : गद्दारांच्या सरकारमध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली : आदित्य ठाकरे

जेव्हा आमदार गोळीबार करायला लागतो, माजी नगरसेवकावर गोळीबार होतो, बिल्डिंगच्या व्हॉट्सअॅपवर वाद होऊन त्यावर भांडण होतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती, तेच व्हिजन घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

Majha Vision 2024 Praful Patel Live : बी टीम असल्याच्या आरोपाने मला फरक पडत नाही: असदुद्दीन ओवैसी

एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाने मला फरक पडत नाही, आम्ही चांगलं काम करत आहोत. ते पुढे म्हणाले की, औरंगाबादमध्ये (छत्रपती संभाजीनगर) इम्तियाज जलील सेनेचा उमेदवार पाडून खासदार झाला, त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा पुन्हा ते निवडून येतील. महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना ओवैसी म्हणाले की, आमची (मुस्लीम) मते हवीत, पण तिकिट द्यायला तयार नाहीत.

Majha Vision 2024 Praful Patel Live : जुने समीकरण मोडून नवीन समीकरण तयार केले - प्रफुल पटेल

Majha Maharashtra Majha Vision 2024 : जुने समीकरण मोडून नवीन समीकरण तयार केले. आमचीही राजकीय दृष्टी - प्रफुल पटेल

Majha Maharashtra Majha Vision LIVE : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल लाईव्ह 

Praful Patel Live : आज एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' हा कार्यक्रम लाईव्ह असणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल लाईव्ह या महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत आहे. 




पाहा लाईव्ह : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल लाईव्ह 



Majha Vision 2024 Live : लोकसभेत मविआचा परफॉर्मन्स चांगला असेल, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

Majha Maharashtra Majha Vision 2024 Live : लोकसभेत मविआचा परफॉर्मन्स चांगला असेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

Majha Maharashtra Majha Vision 2024 : आमचं जागावाटपाचे ठरलं नाही म्हणता, मग त्यांचं तरी कुठे ठरलं? : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना म्हटलं आहे की, आमचं जागावाटपाचे ठरलं नाही म्हणता, मग त्यांचं तरी कुठे ठरलं.

Majha Maharashtra Majha Vision 2024 : एखाद्याने वेगळा निर्णय घेतला म्हणून ती व्यक्ती शत्रू होत नाही : सुप्रिया सुळे

Supriya Sule Live : बदल्याचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखाद्याने वेगळा निर्णय घेतला म्हणून ती व्यक्ती शत्रू होत नाही. आमच्या बरोबर गेले ते चांगले आणि त्यांच्याबरोबर गेले ते वाईट असं नाही. भाजपने केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं. कृपाशंकर सिंह, अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला की नाही, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.


Supriya Sule News : अशोक चव्हाण भ्रष्टाचारी होते की नव्हते, सुप्रिया सुळेंचा भाजपला सवाल

Majha Maharashtra Majha Vision 2024 : अशोक चव्हाण भ्रष्टाचारी होते की नव्हते, भाजपने स्पष्ट करावं, आधी आरोप केले आणि नंतर त्यांना पक्षात प्रवेश दिला, असा सवाल सुप्रिया सुळेंनी भाजपला केला आहे.

Majha Vision 2024 Live Updates : अडचण आली की, भाजपचं शरद पवारांवर खापर, सुप्रिया सुळेंचा घणाघात

Majha Maharashtra Majha Vision 2024 Live Updates : अडचण आली की, भाजपचं शरद पवारांवर खापर फोडते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी घणाघात केला आहे. भष्ट्राचाराचे आरोप आम्ही सत्तेत आल्यावरच होतात, असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केलं आहे.

Majha Vision 2024 : 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण, हे आमचे संस्कार : सुप्रिया सुळे

Supriya Sule Live : 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण, हे आमचे संस्कार आहेत, माझ्यावर चव्हाणांचे संस्कार आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या खास कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी खास मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे

Majha Maharashtra Majha Vision LIVE : खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह 

Supriya Sule Live : आज एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' हा कार्यक्रम लाईव्ह असणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत आहे. 



पाहा लाईव्ह : खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह 


Majha Vision 2024 : आम्ही राष्ट्रवादीसोबत नाही, आम्ही अजित पवारांसोबत - आशिष शेलार

Ashish Shelar News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आम्ही गेलो नाही, आम्ही अजित पवारांसोबत गेलो. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष फोडायचा होता, ती रणनिती होती, असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

Ashish Shelar on MVA : दगा दिला त्यांना दंडित केलं, आशिष शेलारांचा ठाकरे-पवारांवर निशाणा

Majha Maharashtra Majha Vision 2024 : दगा दिला त्यांना दंडित केलं, आम्हाला कुणाला संपवायचं नाही, आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कृष्णनीतीने पटकी देऊ, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


एबीपी माझाचा खास कार्यक्रम माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन : 


Ashish Shelar Live : ... म्हणून नवाब मलिक आमच्यासोबत नाहीत, शेलारांनी स्पष्ट सांगितलं

Majha Maharashtra Majha Vision 2024 : ईडीचे आरोप असलेल्या इतर पक्षातील आयारामांबाबत प्रश्न विचारल्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं की, देश सर्वप्रथम ही भाजपची भूमिका. नवाब मलिकांवरील आरोप यामध्ये बसत नाहीत, म्हणून नवाब मलिका आमच्या सोबत नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.

Ashish Shelar Live : ठाकरेंविना मुंबईत सर्व जागा जिंकू, भाजपचा दावा

Ashish Shelar Live Update : ठाकरेंविना मुंबईत सर्व जागा जिंकू, असा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Ashish Shelar on Raj Thackeray : योग्य टाईमिंग राज ठाकरेंना ठाऊक : आशिष शेलार

Majha Vision 2024 : मनसे सोबतच्या युतीबाबत आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, योग्य टाईमिंग राज ठाकरेंना ठाऊक आहे. एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या खास कार्यक्रमात आशिष शेलार यांनी खास मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. 

Majha Maharashtra Majha Vision LIVE: भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार लाईव्ह

Majha Maharashtra Majha Vision LIVE: आज एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' हा कार्यक्रम लाईव्ह असणार आहे. या कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार येत्या काळासाठी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत आहे. 


पाहा लाईव्ह : आशिष शेलार लाईव्ह 


Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE : आम्ही विकासाला महत्त्व दिलंय : मुख्यमंत्री

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही विकासाला महत्त्व दिलंय. नवीन महायुतीचं सरकार स्थापन करण्यापूर्वी जे प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते, त्या सर्व आम्ही दूर केल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक राज्याचे हिताचे आणि विकासासाठीचे प्रकल्प आपण मार्गी लावले. एक विकासाची घोडदौड जोरात सुरु आहे. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रकल्पावर राबवले जात आहेत."

Majha Vision 2024 LIVE : हाच खरा विश्वासघात म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात; नेमकं काय म्हणाले?

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती. बाळासाहेब आणि पंतप्रधान मोदींचं फोटो लावून आमच्या उमेदवारांनी मतं मागितली आणि स्वत:चं सरकार स्थापन करण्यासाठी, स्वार्थासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं, हा खरा विश्वासघात होता. मतदारांशी विश्वसघात, आपल्या विचारांसोबत विश्वासघात, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता इशारा साधला आहे."

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE: राज्याचा विकास हेच आमचं ध्येय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates: 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही विकासाला महत्त्व दिलंय. नवीन महायुतीचं सरकार स्थापन करण्यापूर्वी जे प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते, त्या सर्व आम्ही दूर केल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक राज्याचे हिताचे आणि विकासासाठीचे प्रकल्प आपण मार्गी लावले. एक विकासाची घोडदौड जोरात सुरु आहे. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रकल्पावर राबवले जात आहेत."

CM Eknath Shinde LIVE: कोविड काळात मी स्वतःच्या जीवाची परवा केली नाही : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde LIVE: कोविडमध्ये मी पीपीई किट घालून फिरलो, स्वतःच्या जीवाची परवा मी केली नाही पण दुसऱ्याच्या जीवाची परवा मी केली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

CM Eknath Shinde Majha Vision : महाराष्ट्राला पुढे नेणं, विकास करणं हेच आमचं ध्येय : मुख्यमंत्री

जे दुष्काळग्रस्त भाग आहेत तिकडे पाणी कसे नेता येईल हे आम्ही निर्णय घेतले. मराठवाडा  वॉटर ग्रीड बासणात गेला होता,बंद केला होता त्याला आम्ही ओपन केलं. जलयुक्त शिवार योजना बंद होती, ती आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल कसे होतील यासाठी आम्ही काम केलं, आज तुम्हाला मी सांगतो अडीच वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि आमच्या दीड वर्षाच्या काळात १२० प्रकल्प सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. 12 लाख हेक्टर जमीन सिंचना खाली येणार आहे, ते शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Majha Maharashtra Majha Vision LIVE: विकास, विकास आणि विकास हेच व्हिजन : मुख्यमंत्री

Majha Maharashtra Majha Vision LIVE: आज एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' हा कार्यक्रम लाईव्ह असणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळासाठी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत आहे. 


पाहा लाईव्ह : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह 


Majha Maharashtra Majha Vision LIVE : राज्यासाठी नेत्यांचं व्हिजन काय असणार?

Majha Maharashtra Majha Vision LIVE : एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व राजकीय नेते महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडणार आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या दोन  वर्षांत प्रचंड उलथा-पालथ झाली आहे. अजूनही राज्याच्या राजकारणातील नाट्यमयी घडामोडींना पूर्णविराम मिळालेला नाही. आधी शिवसेनेतील अंतर्गत फूट, त्यानंतर महाराष्ट्रानं अनुभवलेला अभूतपूर्व सत्तासंघर्ष. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. शिवसेनेत उभी फूट पडली.  महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात न भुतो न भविष्यती असं सरकार सत्तेत आलं. शिंदे-फडणवीस सरकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार. पण हे बंड शांत होतं न होतंच तोपर्यंत राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन गट समोर आले. थोरल्या पवारांचा गट आणि दुसरा अजितदादांचा गट. जेकाही शिंदे गट आणि ठाकरे गटात झालं, काहीसं तेच-तेच राज्यातील जनतेनं पुन्हा शरद पवार गट आणि अजित पवार गटात झाल्याचं अनुभवलं. त्यातही हे बंड शांत होतं न होतं, तोच महाराष्ट्र काँग्रेसला खिंडार पडलं. काँग्रेसमधील मोठं नाव मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि शिंदेंची कास धरली. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये मोठ्या थाटात प्रवेश केला. 

Majha Vision 2024 LIVE: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates Today: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates: महाराष्ट्राच्या राजकारणा उलथा-पालथ; यासर्व रणधुमाळीत नेत्यांचं व्हिजन काय?

Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates: आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यापाठोपाठ शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि पक्षचिन्हाचा वाद, त्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे लढाई आणि हे वादळ शांत होतं न होतं, तोच राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेली फूड आणि थोरले पवार विरुद्ध अजित पवार असा काका पुतण्यात रंगलेल्या पक्ष आणि चिन्हासाठी रंगलेल्या वाद. अशातच हे वादळ शांत होतं, तेवढ्यात मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांच्या रुपात महाराष्ट्र काँग्रेसला पडलेलं मोठं खिंडार. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. 


गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशातच पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय? अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 

Majha Maharashtra Majha Vision: निवडणुकीआधी चर्चा महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या विकासाची, नेत्यांच्या व्हिजनची, आज दिवसभर 'ABP माझा'वर

Majha Maharashtra Majha Vision: मुंबई : यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यानुसार डावपेच आखण्यासही सुरुवात केली आहे. आगामी निवडणुका महाराष्ट्राची (Maharashtra News) पुढची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि चुरशीच्या होणार आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या जनतेनं अनेक राजकीय धक्के सोसले आहेत. न भूतो न भविष्यती अशा अनेक घटना राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) घडला. ज्याचा परिणाम फक्त राजकीय वर्तुळात न राहता सर्वसामान्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचला. 

पार्श्वभूमी

Majha Maharashtra Majha Vision 2024 : निवडणुकीआधी चर्चा महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या विकासाची आणि नेत्यांच्या व्हिजनची.. एबीपी माझावर आज दिवसभर पाहा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध पक्षाच्या बड्या नेत्यांचं महाराष्ट्रापती व्हिजन काय, हे तुम्ही आज दिवसभर पाहू शकाल.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.