Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रीबाबत (Guardian Minister of Raigad) लवकरच काहीतरी चांगलं होईल, जाताना तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन साकडे घालणार असल्याचं वक्तव्य मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या हातात याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. चांगल काम करत राहणार आहे. स्वार्थ आणि आपलेपणा आम्ही कधी केला नाही. काम करण्याची जिद्द आहे. काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या असेही गोगावले म्हणाले.
मराठवाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमामात रोजगाराच्या संधी आहेत. जेवढं काही चांगलं देता येईल तेवढं मी देणार आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलांना याचा फायदा होमार असल्याचे गोगावले म्हणाले. ते आज लातूर जिल्ह्यातील लोदगा येथे एका कार्यक्रमासाठी हजर होते. शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या फिनिक्स फाउंडेशन मार्फत बांबूची लागवड करणाऱ्या पर्यावरण युद्ध्यांना सन्मानित करण्याचा कार्यक्रमासाठी मंत्री भरत गोगवले, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेली ते बोलत होते.
रोजच राजकारण करायचं नसतं, गोगावलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
रोजच राजकारण करायचं नसतं, कधी मित्रत्वही जपायचं असतं. विरोधकही मित्र असू शकतात असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं. स्नेहभोजनासाठी कोणी गेलं असेल तर आदित्य ठाकरे यांना अडचण काय? असा सवाल भरत गोगावले यांनी केला. ते लातूरमध्ये बोलत होते.
दरम्यान, सध्या रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत नाराजीनाट्य असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी याला जोरदार विरोध केला. मंत्री भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री करावं, अशी मागणी होत होती. त्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात देखील गिरीश महाजन यांना पालमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता नवीन नियुक्त्या कधी होणार? पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: