Raigad Pen Latest News Update: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडमध्ये संशयस्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळली आहे. पेणजवळील भोगावती पुलाच्या खालील बाजूला संशयास्पद वस्तू  आढळली आहे. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झालं आहे. त्याशिवा रायगड पोलीस अधीक्षक, खालापूर, रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झालं होतं. त्याशिवाय मुंबई आणि रायगड येथील बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले.

  


मुंबई गोवा हायवेवरील पेणनजीक स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पेणजवळ भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सदृश्य कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एकच खळबळ उडाली. 


बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पेणजवळ भोगावती नदीपात्रात गेलेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये संशयास्पद वस्तू दिसून आली. त्या व्यक्तीनं तात्काळ काही लोकांना सांगितलं. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची पेण पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, संशयापसद वस्तूची पडताळणी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.  




पोलिसांसह बॉम्बशोधक पथक पेणजवळ भोगावती नदीच्या पुलाच्या खाली पोहचलं आहे. त्या वस्तूचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मुंबई आणि कोकणात जाणारी लेन बंद केली आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली आहे. 


आणखी वाचा : Poladpur Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपये मदतीची घोषणा


संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण


दरम्यान, मुंबई- गोवा हायवेवरील पुलाखाली मिळालेल्या स्फोटक सदृश्य वस्तुमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नदीपात्रात आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूच्या पडताळणीसाठी रायगड आणि नवी मुंबईतील बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी, सुमारे चार तास सुरु राहिलेल्या पडताळणीमध्ये जिलेटीन सदृश्य स्फोटकांच्या सहाय्यानं डमी बॉम्ब बनवण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी, या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये वायर आणि घड्याळाचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. 


हे ही वाचायला विसरु नका : 


Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत अभ्यास मंडळात सुटा, तर 'पदव्युत्तर'मध्ये सुप्टाची सरशी