Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने 17, तर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) 10 अभ्यास मंडळांवर वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे. ‘सुटा’चे 14 उमेदवार निवडून आले. यापूर्वी त्यांचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेच्या 39, विद्या परिषद 8 व 9 अभ्यास मंडळांसाठी प्रत्येकी 3 सदस्य निवडून द्यायचे होते. प्राचार्य गट व महाविद्यालयीन शिक्षक गटातून प्रत्येकी 10, संस्था चालक 6, विद्यापीठ अधिविभाग शिक्षक 3, नोंदणीकृत पदवीधर 10 जागांचा त्यात समावेश होता.


विद्या परिषद गटात ‘सुटा’चे डॉ. सुनील चव्हाण खुल्या प्रवर्गातून 1725, तर सुनील बनसोडे अनुसुचित जाती गटातून 1746 मते मिळवून विजयी झाले. महाविद्यालयीन शिक्षक गटात सुटाचे डॉ. ज्ञानदेव काळे यांनी भटक्या विमुक्त जातीतून 1624, तर प्रा. डॉ. बबन सातपुते यांनी अनुसूचित जातीतून 1540 मते मिळवून बाजी मारली.


विद्यापीठ अधिविभाग शिक्षक गटातून शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेचे (सुप्टा) तीन उमेदवार निवडून आले. त्यात संख्याशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. शशीभूषण बाबासाहेब महाडिक, प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. माधुरी वसंत वाळवेकर व रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. शंकर हंगीरगेकर यांचा समावेश आहे. 


विद्यापीठ अधिविभागातील शिक्षकांच्या मतमोजणीत खुल्या जागेवर महाडिक 88 , राखीव प्रवर्गातील अनुसूचित जमातीमधून डॉ. हंगीरगेकर 97, तर महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. वाळवेकर 82 मते मिळवून विजयी झाल्या. महिला प्रतिनिधी गटात इंग्रजी अधिविभागातील तृप्ती किसन करेकट्टी, कम्प्युटर सायन्स अधिविभागातील प्रा. डॉ. उर्मिला राजेंद्र पोळ व स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील पुनश्री फडणवीस पराभूत झाल्या. 


9 अभ्यास मंडळांवर निवडून आलेले उमेदवार 



  • मानसशास्त्र - विकास सुदाम मिणचेकर, विनायक मधुकर वनमोरे, विजयमाला विरेंद्र चौगुले (सुटा)

  • प्राणीशास्त्र - सत्यवान सुबराव पाटील व तानाजी महादेव चौगुले (सुटा), लझारस प्रभाकर लंका (शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी)

  • रसायनशास्त्र - दत्तात्रय कृष्णा दळवी व रघुनाथ कुशाबा माने (सुटा), रमेश श्रीमंत यलकुद्रे

  • वाणिज्य - रविंद्र कौस्तुभ दिवाकर, अमोल गोवर्धन सोनवले (सुटा), उदयकुमार रामचंद्र शिंदे

  • अर्थशास्त्र - प्रभाकर तानाजी माने (सुटा), अनिल धोंडीराम सत्रे, जयवंत शंकरराव इंगळे (शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी)

  • इंग्रजी - डी. डी. वाघमारे, उत्तम रामचंद्र पाटील (सुटा), आप्पासाहेब सिध्दप्पा हरबोले

  • भूगोल व भूशास्त्र - बाळासाहेब सोबा जाधव, रत्नदीप गोविंद जाधव, अजयखान शिराज शिकलगार

  • हिंदी - भास्कर उमराव भवर व संग्राम यशवंत शिंदे (सुटा), अशोकविठोबा बाचूळकर

  • व्यावसायिक अर्थशास्त्र - डॉ. संजय धोंडे (शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी), डॉ. हिंदूराव संकपाळ व डॉ. गजानन पट्टेबहाद्दूर (सुटा)


इतर महत्वाच्या बातम्या