Viral Video: किल्ले रायगडवर पिंडदान करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान या सर्व घटनेनंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  


याप्रकरणी प्रतिक्रिया देतांना विनोद पतीला म्हणाले आहे की, रायगड किल्ल्यावर पिंडदान करणाऱ्या समाज विघातक वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो. हे पिंडदान करणाऱ्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच कोरोना काळामध्ये रायगड किल्ल्यावरती शिवभक्तांना जाण्यासाठी एक पत्र काढून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी बंदी घातली होती. आज मात्र त्या ठिकाणी पिंडदान झाले. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यावरती निश्चित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. 


तसेच हे प्रकरण उघडकीस आणणारे शिवभक्त यांनी समोर येऊन पुरावे सादर करावे. माझी सर्व शिवभक्तांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की, यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांची उचल बांगडी करावी, असेही पाटील म्हणाले. 


काय आहे प्रकार... 


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, ज्यात रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवरायांच्या  समाधी जवळच्या एका कोपऱ्यात पिंडदानाचा कार्यक्रम सुरु असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. याबाबत माहिती मिळताच शिवप्रेमींना धाव घेत हा कार्यक्रम रोखला. मात्र एबीपी माझा या व्हीडिओची पुष्टी करत नाही.


महत्वाच्या बातम्या...


 Raigad Fort : किल्ले रायगडवर पिंडदान करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल


किल्ले रायगडावर 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न