Raigad News : रायगडच्या कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर (Korlai beach) सहा जुलै रोजी रात्री एक संशयित बोट असल्याचा दावा कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यानंतर या संशयित बोटीचा तपास सुरू असताना दोन दिवसांपूर्वी ही बोट नसून तो पाकिस्तानमधून वाहून आलेला मच्छिमारी बोटीचा बोया असल्याची माहिती उघड झाली होती. मात्र हा बोया या पाण्यातून अचानक गायब झाला होता त्यानंतर दोन दिवस सुरू असलेल्या पोलीस यंत्रणांच्या तपासात आज(12 जुलै) या बोयाचा अवशेष रायगडच्या कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला आहे.

Continues below advertisement


दुसरीकडे, रायगड जिल्ह्यात मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास 287 बोटी या अनधिकृत असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. आतापर्यंत 3 हजार 500 बोटींचा तपास पोलिसामार्फत करण्यात आला आहे. यामध्ये 2800 बोटी या नोंदणी असल्याची खातरजमा पोलिसांना झाली असून उर्वरित 637 बोटींची नोंदणी मालक सापडत नसून 287 बोटी या नोंदणी नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे जो पर्यंत या बोटींचे मालक सापडत नाही, तोपर्यंत या बोटींना आम्ही नोंदणीकृत समजू असा इशारा आंचल दलाल यांनी बोट मालकांना दिला आहे. कोर्लई समुद्रात आढळून आलेल्या संशयास्पद बोया नंतर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे.


अखेर तो संशयित बोया सापडला


रायगडच्या कोर्लई समुद्र किनारी एका फिशिंग बोयाने सर्व यंत्रणांची झोप उडविली होती. मागील चार दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा, अलिबाग, मुरूड, कोर्लई, मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलीस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा विविध यंत्रणांच्या आधारावर समुद्रातून वाहून आलेल्या फिशिंग बोयाचा शोध घेत होते. मागील पाच महिन्यांपासून हा बोया समुद्रात फिरत असल्याची माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे. त्यामुळे रायगडचे समुद्र किनारे रायगड पोलिसांकडून मोठ्या शिताफीने बॉम्ब डिटेक्टरच्या सहाय्याने या हालचाली शोधण्याचे काम सुरू होते. अखेर पोलीस यंत्रणांच्या तपासात आज (12 जुलै) या बोयाचा अवशेष रायगडच्या कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला आहे. त्यामुळे आता सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याच पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या