Pushpa 2 Box Office Collection Day 6 In Hindi: अल्लू अर्जुननं (Allu Arjun) बॉक्स ऑफिसवर (Box Office) इतिहास रचला आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं (Pushpa 2 The Rule) बॉक्स ऑफिस अक्षरशः हादरवून सोडलंय. अल्लू अर्जुनचं स्टारडम दररोज भल्या भल्या स्टार्सचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. विशेष म्हणजे, हा पॅन इंडिया चित्रपट असला तरीसुद्धा हिंदी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. हिंदी भाषेतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचवेळी तो प्रचंड नफाही कमावत आहे. रिलीजच्या 6 दिवसांतच या चित्रपटानं आतापर्यंत अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. 'पुष्पा 2: द रुल'नं रिलीजच्या 6 व्या दिवशी म्हणजेच, पहिल्या मंगळवारी हिंदी भाषेत किती कोटी रुपये कमावलेत? जाणून घेऊयात सविस्तर...
'पुष्पा 2: द रुल' नं रिलीजच्या 6 व्या दिवशी हिंदी भाषेत किती कलेक्शन केलं?
'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा पॅन इंडिया चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तसं पाहिलं तर, चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. थिएटर्समध्ये धडकल्यानंतर या चित्रपटानं एकच खळबळ उडवून दिली आणि जबरदस्त ओपनिंग केली. त्यानंतर विकेंडलाही 'पुष्पा 2: द रुल'नं इतिहास रचला. आता हा चित्रपट विक डेजमध्येही कमाल करत आहे. विशेषत: हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांना वेड लावत आहे आणि यासोबतच तो हिंदी बॉक्स ऑफिसवर दररोज मोठी कमाई करत आहे.
चित्रपटाच्या हिंदी भाषेतील कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 70.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 56.9 कोटी, तिसऱ्या दिवशी 73.5 कोटी आणि 85 कोटी रुपयांचा गल्ला केला. चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी 46.4 कोटी रुपये कमावले. अशातच आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवसाच्या म्हणजेच, पहिल्या मंगळवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल'नं सहा दिवसांत हिंदीमध्ये 38 कोटींची कमाई केली आहे.
- यासोबतच 'पुष्पा 2: द रुल'चा हिंदी भाषांमध्ये 6 दिवसांचं एकूण कलेक्शन आता 370.1 कोटी रुपये झालं आहे.
- तसेच, सर्व भाषा मिळून 'पुष्पा 2: द रुल'नं 6 दिवसांत एकूण 645.95 कोटींची कमाई केली आहे.
'पुष्पा 2' नं हिंदीतील एक सोडून सर्व दाक्षिणात्या चित्रपटांना धूळ चारली
एक वगळता, पुष्पा 2 नं कोविडनंतर प्रदर्शित झालेल्या सर्व हिंदी डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांना मागे टाकलं आहे. सध्या, पुष्पा 2 कन्नड सुपरस्टार यशच्या 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या KGF: Chapter पासून एक पाऊल दूर आहे. बॉक्स ऑफिसवर 6 दिवसांत हिंदी भाषेत एकूण 370 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह, पुष्पा 2 नं या हिंदी डब केलेल्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
- केजीएफ: चॅप्टर 2 (2022): 434.62 कोटी
- पुष्पा 2 (2024): 379 - 370 कोटी
- कल्कि 2898 एडी (2024): 295 कोटी
- आरआरआर (2022): 277 कोटी
- 2.0 (2018): 188 कोटी
- सालार (2023): 152 कोटी
- आदिपुरुष (2023): 147 कोटी
- पुष्पा (2021): 106 कोटी
- कांतारा (2022): 81.10 कोटी
- देवारा (2024): 68.14 कोटी
हिंदी बॉक्स ऑफिसवर 400 कोटींपासून एक इंच दूर
पुष्पा 2 बुधवारी हिंदी भाषेत 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, त्यामुळे सात दिवसांत हा आकडा गाठणारा सर्वात जलद चित्रपट ठरेल. दरम्यान, चित्रपटाचा वेग पाहता, बॉक्स ऑफिसवर त्याचं आयुष्यभराचं कलेक्शन 650 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असेल असं आतापर्यंतच्या चित्रावरुन दिसतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :