Pushpa 2 Flop: 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 The Rule) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुवांधार कमाई करत आहे. जगभरात पुष्पाचं जणू वादळ आलं आहे. दररोज पॅन इंडिया 'पुष्पा 2' कोट्यवधींचं कलेक्शन करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? तेलगु, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटानं 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाला अगदी सहज मागे टाकलं आहे. आम्ही हे असंच नाही सांगत, तर कलेक्शनच्या आकड्यांवरुन सांगत आहोत. ज्यामध्ये पहिल्या वीकेंडमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटानं केवळ 3.55 कोटींची कमाई केली आहे. तर, फक्त 40 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटानं पुष्पा 2 ला अगदी सहज झुकवलं आहे.
40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला बघीरा हा चित्रपट आहे, जो 31 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. बघीरा हा 2024 चा कन्नड भाषेतील सुपरहिरो चित्रपट आहे जो डॉ. सुरी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाची कथा प्रशांत नील यांच्या कथेवर आधारित आहे. तर, याची निर्मिती विजय किरागांडूर निर्मित आहे. यात श्रीमुरलीसह रुक्मिणी वसंत, प्रकाश राज, सुधा राणी, रामचंद्र राजू, अच्युथ कुमार आणि रंगायना रघु यांच्या भूमिका आहेत. 2024 मधील हा सर्वात हाईएस्ट ओपनिंग करणारा कन्नड चित्रपट आहे.
बघीरानं पहिल्या दिवशी 2.55 कोटींची ओपनिंग केली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2.9 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी हा आकडा 3.2 कोटींवर पोहोचला. तर, चौथ्या दिवसाची कमाई 2.85 कोटी इतकी होती. त्यामुळे पहिल्या वीकेंडला चित्रपटाचं कलेक्शन केवळ 11 कोटी रुपये झालं. मात्र, 20.05 कोटी रुपयांची कमाई करूनही तो बजेटच्या तुलनेत फ्लॉप ठरला.
पुष्पा 2 बद्दल बोलायचं तर, पुष्पानं कन्नडमध्ये पहिल्या दिवशी 1 कोटींची कमाई केली होती. चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 65 लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी हा आकडा 80 लाख होता. तर चित्रपटानं 1.1 कोटींची कमाई केली. यामुळे चित्रपटानं 3.55 कोटींची कमाई केली, त्या तुलनेत बघीराची कमाई खूपच जास्त आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :