पुणे : नवीन फ्लॅट बघण्यासाठी आलेल्या महिलेचा 17 व्या मजल्यावरुन पडून जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील मेगासिटी पौडफाटा येथील कुमार बिल्डरच्या इमारतीत घटना घडली. सॅम्पल फ्लॅट बघताना महिलेचा तोल गेल्याची माहिती मिळते आहे.
42 मजल्यांची इमारत असून, 17 व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील आतापर्यंतची सर्वात उंच ही इमारत असल्याचा दावा करण्यात येतो आहे.
सॅम्पल फ्लॅट पाहताना तोल जाऊन महिला खाली पडली आणि जागीच मृत्यू झाला. बिल्डिंगखाली बांधकामाचं साहित्य आणि पत्रे होते.
दरम्यान, महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. शिवाय, फ्लॅट बघण्यासाठी कुणासोबत आली होती, हेही कळू शकेलेलं नाही. महिलेचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.