Pune Crime News: कन्टेंन्ट क्रिएटर विजया गावडे या सोशल मीडियासाठी एक व्हिडियो बनवतात. ज्या व्हिडियोत ट्रान्सजेंडर समुदायाद्वारे पाळल्या जाणार्या काही विचित्र विधींचे वर्णन करत होत्या. मात्र एका तृतीयपंथीला व्हिडिओचा राग आल्याने तृतीयपंथीयांनी विजया यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.
शिवलक्ष्मी झाल्टे या तृतीयपंथी महिलेला व्हिडिओ आक्षेपार्ह वाटला. तृतीयपंथी समाजाची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी शिवलक्ष्मी झालटे यांनी नाशिकमध्ये गावडे यांच्या विरोधात 2019 च्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे गावडेला ताब्यात घेण्यात आले होते आणि जामिनावर सुटका करण्यात आली होती.
विजया गावडे या मूळच्या बारामतीच्या रहिवासी असून त्यांवी झालटे यांनी शिक्षा करण्याची धमकी दिल्यानंतर यापूर्वी माफी मागितली होती. झालटे यांनी रेकॉर्ड करून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये गावडे यांनी नंतर माफी मागितली, परंतु ते पुरेसे नव्हते. आपल्या मुलाची जाहीर बदनामी केली जाईल, असे सांगून तिने गावडे यांना धमकी दिल्याचा आरोप आहे.
झालटे यांनी विजया यांना विश्रांतवाडीतील एका इमारतीत बोलावून घेतले आणि पुन्हा एकदा सर्वांची माफी मागा, असं सांगितलं होतं. त्यावेळी झालटे आणि काही व्यक्तींनी गावडे यांना मारहाण केली. सोशल मीडियाच्या वापरासाठी या कृत्याचे चित्रीकरण करताना त्यांनी तिच्या गळ्यात चपलांची माळाही बांधली होती. सागर शिंदे, शिवलक्ष्मी झाल्टे, मोहिनी हजारे, अनुजा लोहार, अश्विनी जाधव, संजीवनी राणे आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पाच स्त्री-पुरुषांची नावे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आहेत. त्यांच्यावर कलम 143 , 147 , 324, 323, 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडियो समोर येत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाईसुद्धा होत आहे. मात्र यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे, असं तज्ञांचं मत आहे.