पुणे: कोथरुड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) पुन्हा पोलिसांच्या (Police) रडारवर आला आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या घायवळच्या (Nilesh Ghaywal) मुलाच्या फीचा स्रोत पोलिस तपासणार आहेत. पोलिसांनी परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणासाठी भरलेली रक्कम कोणत्या खात्यातून आणि कोणत्या माध्यमातून देण्यात आली आहे, याची माहिती मागवली आहे. आतापर्यंत घायवळची बँक खाती आणि लाखोंची मालमत्ता गोठवली आहे. निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) आणि त्याच्या भावाने बळकावलेल्या दहा बेकायदेशीर सदनिका सील करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. घायवळ टोळीच्या आर्थिक नाकेबंदीची मोहीम वेगात सुरू आहे. (Nilesh Ghaywal) 

Continues below advertisement


Pune Police: परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करणार


दरम्यान, कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर आतापर्यंत निलेश घायवळविरुद्ध (Nilesh Ghaywal)  पाच ते सहा गुन्हे नोंदवले गेले आहेत. आता पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. घायवळांचा मुलगा सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहे आणि पोलिसांना त्याच्या शिक्षणाचा खर्च किती आहे, कोणत्या मार्गाने भरला गेला याची माहिती हवी आहे. म्हणूनच पुणे पोलिस तयारीत असून संबंधित परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करून शिक्षणाच्या फी भरण्याचे स्रोत, पद्धत आणि खातेविवरण विचारण्यात येणार आहे.(Nilesh Ghaywal) 


Pune Police: घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची तब्बल १० बँक खाती गोठवण्यात आली


कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळविरुद्ध गुन्हे नोंदवले गेल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. एकामागून एक नवीन गुन्हे उघड होत असतानाच पोलिसांनी त्याची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. आतापर्यंत घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची तब्बल १० बँक खाती गोठवण्यात आली आहेत, तर काही मालमत्तांवरही सील लावण्यात आले आहे. घायवळ टोळीच्या आर्थिक स्रोतावर गदा आणण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.


याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून त्याने गुन्हेगारी मार्गाने मोठा आर्थिक फंड उभारला आहे. या फंडाचा मागोवा घेण्यासाठी आणि पैशांचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी झालेले आर्थिक व्यवहारही तपासले जाणार असून, यासाठी संबंधित विद्यापीठाशी संपर्क साधला जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली.


Pune Police: कोथरूडमधील त्या दहा सदनिका सील करण्याचे आदेश...


निलेश घायवळने कोथरुड परिसरातील एका अपार्टमेंटमधील दहा सदनिकांवर बेकायदेशीर ताबा मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या सदनिका भाड्याने देऊन त्यातून मिळणारा आर्थिक लाभ घायवळ घेत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सर्व सदनिका खाली करून सील करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.