Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) आज बंद राहणार आहे. जवळपास निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद असणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटल्याने (Pune Water Supply) आज शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पुणे शहरातील अनेक भागात आज पाणी सोडलं जाणार नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या (शनिवारी) शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार (Pune Water Stoarage) आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, स्वारगेट,ससून सर्वोपचार रुग्णालय,गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबाग या भागांतील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आज आणि उद्या पाण्याच्या पाणी जपून वापरावं लागणार आहे.
शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद
शहरातील महत्त्वाच्या भागातील पाणीपुरवठा (Pune Water Supply) आज बंद असल्याने आणि उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने पाणी जपून वापरा, असं आवाहन पुणे महानगर पालिकेने (Pune water supply) केलं आहे. ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
सोमवार पेठ, मंगळवार पेठ, स्वारगेट,ससून सर्वोपचार रुग्णालय,गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबाग या भागांतील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे.