Ashadhi Wari 2022 : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थन ठेवलं आज निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केलं जातं त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांंचं निरा नदीच्या पाण्याने स्थान घातले जाते. गेले अनेकवर्ष या स्नानाची परंपरा सुरु आहे.
पुणे, जेजूरी, वाल्हे करत आज पालखी लोणंद गावी पोहचते. त्याआधी निरा स्नान घातलं जातं. कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखी नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेंव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला.
संपुर्ण वारीत तीन वेळा स्नान
आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये तीन वेळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. सगळ्यात आधी आळंदीतून प्रस्तान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं. त्यानंतर आज निरा नदीमध्ये स्नान घातला जातं आणि शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घातलं जातं.
लाखोंच्या संख्येने वारकरी
कोरोनामुळे दोन वर्ष पायी वारी सोहळा होऊ शकला नाही. यंदा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील लहान गावांमध्येही उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. प्रत्येक गावातील लहान-मोठे वारकरी अगदी उत्साहाने वारकऱ्यांची सेवा करत आहे. पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दीदेखील होत आहे. दिवे घाटाचा पालखीचा कठीण टप्पा पार केल्यानंतर पालखी जेजूरीत थांबते. जेजूरीकरांनी देखील यंदा जोमात पालखीचं स्वागत केलं. भंडारा उधळत अभंगाच्या तालावर ताल धरला. पायी वारी होत असल्याने वारकरी आणि नागरिक आनंदी आहे. वाल्हेतील मुक्काम संपवून वारी लोणंदच्या दिशेने रवाना होईल. त्यापुर्वी पादुकांना निरा स्नान घातलं जातं. यात तिरावर अनेक वारकऱ्याांनी अभंग गात स्नानाचा आनंद तुटला.