पुणे : हिंम्मत आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते. या गोष्टीचाच प्रत्यय पुण्यातील आंबेगाव याठिकाणी आला आहे. एका पाळीव कुत्र्याने चक्क बिबट्याला मात देत त्याला पळवून लावले आहे, या सर्व घटनेचा व्हिडीओही मोबाईलमध्ये चित्रित झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर बिबट्याला स्वतःच्या जबड्यात धरणारा हा पाळीव कुत्रा आंबेगावच्या गणेश शेवाळे यांच्याकडील असून त्याने 15 दिवसांमध्ये दोनदा बिबट्याविरुद्धच्या भांडणात स्वत:ला वाचवत बिबट्याला चक्क पळवून लावले आहे.  शेवाळे यांच्या घरी वाघ्या हा कुत्रा 10 वर्षांपासून असून त्यांनीच त्याला वाघ्या असं नाव दिलं आहे.


आतापर्यंत अनेकदा आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी जात असल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण वाघ्या या कुत्र्यानेच त्याच्या जबड्यात बिबट्याला धरलं आणि झटापटीत जखमी झालेल्या बिबट्याला अखेर तिथून पळ काढवा लागला. तर या सर्वाचा व्हिडिओही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  या व्हिडिओत घराजवळ कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाळीव कुत्र्याने  बिबट्याला आपल्या जबड्यात पकडून ठेवले, ज्यामुळे बिबट्या बराच वेळ निपचित पडला होचा. त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. खूप प्रयत्नानंतर अखेर बिबट्या स्वत:ला सोडवण्यात यशस्वी झाला, त्यानंतर बिबट्या तिथून पळू गेला. तर या व्हिडीओवर एकदा नजर फिरवाच...



इतर महत्वाच्या बातम्या