मुंबई : मुकादम हातगाडी ओढायचे काम देत नाही तर ज्याला काम दिलं त्याची रागात डोक्यात दगड घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सगळी थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजमुल सलमानी या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही घटना जेजे मार्ग जवळ असलेल्या सुर्ती मोहल्ला येथील फुटपाथवर घडली आहे. अजमुल सलमानी या आरोपीने त्याचा मुकादम जाबिर खान याच्याशी काल रात्री काम देत नसल्यामुळे भांडण केले होते. यामुळे जाबिर याने जेजे मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात एनसी दिली. मात्र पोलीस ठाण्यातून बाहेर येऊन अजमुल सलमान हा जाबिर खानची हत्या करण्याचा दृष्टीने शोध घेत होता. मात्र जाबिर त्याला सापडला नाही. म्हणून त्याने अजमुलच्या जागेवर ज्याला काम दिले होते त्या अकबर अलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दुकानाच्या समोर अकबर अली गाढ झोपेत असताना त्याच्या डोक्यात भला मोठा दगड अजमुलने घातला आणि पळ काढला.
आजूबाजूच्या लोकांनी जखमी अवस्थेत असलेल्या अकबरला जेजे हॉस्पिटल मध्ये दाखल केले. सध्या ते कोमात आहे. तर घटनेची माहिती मिळताच दोन तासात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला भायखळा रेल्वे स्थानकातून अटक केली. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जाबिर खान या त्याच्या मुकादमने केली आहे.
अगदी क्षुल्लक अशा कारणावरून घडलेल्या घटनेमुळे एका निरपराध माणसाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे आता अजमुलला किती काळाची शिक्षा होते हे पाहणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :