पुणे : शरद पवार यांच्याप्रमाणे अपग्रेड राहा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांना  दिला आहे. काळ बदलला, विद्यार्थी देखील अपग्रेड होतायेत, त्यामुळं शिक्षकांनी देखील काळानुरूप बदल करायला हवेत. जी पदवी घेतली त्यावरच अवलंबून राहू नये. शरद पवार यांना मी खूप जवळून पाहतो. ते आजही तरुण पिढीसोबत चालण्याचे प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले. तर शिक्षक हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असतो असे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. 


कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या अरुणोदयने अमिताभ बच्चन यांची बोलती बंद केली. आजची मुलं तंत्रज्ञानामुळं कुठल्या कुठं चाललीत. कारण ती तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप अपडेट असतात. त्यामुळं शिक्षकांनी देखील तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला हवं, नेहमी अपग्रेड व्हायला हवं, त्याच ज्ञान घ्यायला हवं असा सल्ला अजित पवार यांनी शिक्षकांना दिला आहे. पुण्यात महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांसह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित होते.


संस्था कोणतीही असो, त्याची वास्तू ही आम्ही मोठी उभारु. पण त्या वास्तूत काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असते की त्यांनी चोख कामे करायला हवीत. कारण, अनेक वरिष्ठ अधिकारी कनिष्ठावर सोपवून मोकळे होतात. दिलेल्या अधिकारांचा गैरफायदा घेतात. अलीकडे अशी खूप उदाहरणं समोर येत आहेत.  कोण ते सुपा की सुपे, त्यांच्याकडे नोटांची बंडल अन बॅगा सापडतयेत, हे आपण पाहतोय. त्याची चौकशी सुरु आहे. त्याचे धागेदोरे कुठं ही जाऊ दे, पण प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायला हवी, असेही पवार यावेळी म्हणाले.


सीबीआयला भरपूर कामं, पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू
पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असं पुन्हा घडू नये.
यात राजकारण आणू नये असे अजित पवार म्हणाले. सीबीआयला भरपूर कामं आहेत. पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. याआधीही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली आहेत. सुशांत सिंग प्रकरणात काय झालं, शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं. उगाच आभास करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू असेही ते म्हणाले.


एसटी गोरगरिबांची वाहिनी, कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये
एसटी ही गोरगरिबांची वाहिनी आहे. हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये. सर्वांनी समजंसपणाची भूमिका घ्यायला हवी. दोन पावलं सर्वांनीच मागे येऊन प्रकरण मिटवायला हवे असे अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या बाबतीत सरकारने सांगितलेले नियम सर्वांनी पाळावेत. आता इथं काही पत्रकारांनी मास्क काढलेत. हे मी बोलणार नव्हतो. पण नियम सर्वांसाठी आहेत. ओमयक्रॉनचा धोका पाहून त्याचं तंतोतंत पालन करावं आणि तसं वागावं असे आवाहन देखील पवार यांनी केले. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने भूमिका घ्यावी. लोकांमध्ये जनजागृती करावी. सगळे नियम पाळतील अशा बातम्या द्याव्यात. अजून निष्काळजीपणा दिसतोय, तो दूर व्हायला हवा असे ते म्हणाले. अनेकजण दुसऱ्या देशातून आपल्याकडे येतात, त्यांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी करायला हवी. थोडं तारतम्य बाळगायला हवे असे अजित पवार म्हणाले. 12 आमदार निलंबीत केलेला विषय हा सभागृहाचा आहे. याबाबतीत सभागृहात बोलावं लागतं, बाहेर याबाबत जास्त बोलता येत नाही असे पवार म्हणाले.


शिक्षक हा आयुष्याचा महत्वाचा भाग - आदित्य ठाकरे
माझी राजकीय पार्श्वभूमी असली तरी मंचावर उभं रहायला मी घाबरायचो. पण माझ्या प्रिन्सिपल सरांनी ते धाडस मला दिलं. त्यामुळं शिक्षक हा आयुष्याचा महत्वाचा भाग असतो असे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. सध्या सॉफ्टवेअर अपग्रेड होत आहे, असावेळी शिक्षकांना देखील अपग्रेड करणं तितकंच गरजेचं असल्याटे ठाकरे म्हणाले.


 महत्त्वाच्या बातम्या: