एका श्रीमंत व्यक्तीनं दोन हजाराच्या खऱ्या नोटांनी ही कार सजवल्याचं काही जण म्हणायचे, तर प्रेयसीला कार गिफ्ट करणाऱ्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन डे तुरुंगात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे.
ही कार पुण्याजवळच्या हिंजवडीतील झूम कार कंपनीची असल्याची माहिती आहे. कंपनीच्या एका कॅम्पेनसाठी ही कार अशी सजवण्यात आली आहे. कारवरील या खोट्या नोटा ग्राहकांना बक्षीस जिंकून देणार आहेत.
या नोटांमध्ये सात नोटा खऱ्या नोटांप्रमाणे छापण्यात आल्या आहेत. त्या नोटांवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया असं लिहिण्यात आलं आहे. या सात नोटा तुम्ही शोधल्या, तर तुम्हाला चौदा हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे हे बक्षीस रोकड स्वरुपात नसून कॅशलेस दिले जाईल.
पाहा व्हिडीओ :