पुणे:पुण्यातील नाना पेठेत डोके तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा रविवारी 1 सप्टेंबरला रात्रीच्या वेळी खून झाला होता. या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी वनराज आंदेकरची बहीण संजीवनी कोमकर आणि तिच्या दिरासह सोमनाथ गायकवाडला अटक केली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा सोमनाथ गायकवाड असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे.
वनराज आंदेकर याचा खून कौटुंबिक कारणांनी आणि संपत्तीच्या वादातून झाला असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, जयंत कोमकर यांना अटक केली आहे. याशिवाय सोमनाथ गायकवाडला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना सोमनाथ गायकवाडवर संशय का?
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता.त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड याने संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, प्रकाश कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी शहरातून पाच जणांना अटक केली होती. तर, रायगड जिल्ह्यातून अन्य १३ संशयितांना अटक केली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणानं खळबळ
वनराज आंदेकरचा खून त्याच्या बहिणींच्या इशाऱ्यावरुन करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. दुकानांचं अतिक्रमण काढायला लावल्याच्या रागातून वनराज आंदेकरचा खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. रविवारी वनराज आंदेकरचा खून झाला होता. या प्रकरणात टोळी युद्धाचा अँगल आहे का यादृष्टीनं पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता. आंदेकर खून प्रकरणातील पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त यांनी दिली होती.
रविवारी रात्री 1 सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
इतर बातम्या :
मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून उचललं