पुणे: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना रविारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे तर दुसरीकडे टोळीयुध्दाची पार्श्वभूमी देखील तपासली जात आहे. सदर प्रकरणी आता पोलिसांनी या घटनेनंतर आंदोकर यांच्या बहीण, मेहुणा, भाचा यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शी ही हत्या कौटुंबिक   वादातून केल्याचं समोर आलं मात्र, आता या घटनेबाबच अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. दरम्यान आंदेकरांच्या शेवटच्या काही सोशल मिडियाची जोरदार चर्चा सुरू आहे. 




शेवटच्या इंस्टाग्राम पोस्ट


वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्येच्या घटनेआधी त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरती शेअर केलेल्या काही पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. आंदेकरांनी चौथ्या श्रावण सोमवारी मंदिरात पूजा केली होती, या पुजेचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केली होती आणि त्याचबरोबर त्यांनी दहीहंडी उत्सवातही सहभाग घेतला होता. यावेळी ते आनदांत नाचताना दिसून आले, हे दोन कार्यक्रम आंदेकर याच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्ट ठरल्या आहेत, या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. 




अंगावर काटा आणणारं CCTV फुटेज


वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले. तसेच यानंतर वनराज आंदेकर कोयत्याने वार देखील केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचं भयानक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे. नाना पेठेत वनराज आंदेकर (Vanraj Anderkar) आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास सात दुचाकीवरुन जवळपास 14 ते 15 जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. वनराज आंदेकर यांच्यावर (Pune Crime News) हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढताना दिसतात. 


कोण आहे वनराज आंदेकर?


वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. 


गोळीबाराने नव्हे, तर कोयत्यांच्या 15 वारांमुळे गेला जीव


वनराज आणि शिवम तेथून पळून जात असताना संजीवनी कोमकर आणि जयंत कोमकर हे नाना पेठेतील त्यांच्या घरातील बाल्कनीत उभे राहून हल्लेखोरांना मारा मारा, सोडू नका, जिवे ठार मारा, अशी चिथावणी देत होते. या वेळी मात्र शिवम पळून जाण्यात यशस्वी ठरला. वनराज हे खाली पडले. या वेळी हल्लेखोरांनी वनराज यांच्या मानेवर, चेहऱ्यावर, डोक्यावर, छातीवर, हातावर तब्बल 14 ते 15 वार करून हत्या केली. या वेळी आरोपींच्या दहशतीमुळे नागरिकांनी तत्काळ दुकाने बंद केली. प्राथमिक वैद्यकीय माहितीमध्ये वनराज यांच्यावर पिस्तुलातून 5 गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र त्यातील एकही गोळी त्यांना लागली नाही. मात्र कोयत्याच्या 15 वारांमुळे त्यांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.