पुणे: पुण्यात मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणास्तव मारहाण, खून, हत्या अशा घटना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. असं असतानाच हडपसर परिसरात हॉटस्पॉट न दिल्यामुळं कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  टोळक्याने गृहकर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निर्घृण ण खून केला. मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा हत्या (Pune Crime News) करण्यात आल्याचं समोर आलं आहे.


वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय 47, रा. उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड, हडपसर) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयूर भोसले (वय २०, रा. वेताळबाबा वसाहत) याला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्यासह आणखी तीन अल्पवयीन आरोंपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वासुदेव कुलकर्णी यांचा भाऊ विनायक कुलकर्णी (वय 51) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (ता.1) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास उत्कर्षनगर सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सासवड रोड येथे घडली आहे.


पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी हे गृहकर्ज मिळवून देण्याबाबतची एजन्सी चालवत होते. शनिवार पेठेमध्ये त्यांचे ऑफिस आहे. रविवारी ऑफिसला बंद असल्यामुळे वासुदेव घरीच होते. रात्री साडेदहा वाजता त्यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केलं. त्यानंतर ते काही वेळ फिरण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडले. सोसायटी समोरील फुटपाथवर सासवड रोडकडे ते थांबले असताना आरोपींनी वासुदेव यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉटची मागणी केली. वासुदेव यांनी नकार दिला. या कारणातून त्यांच्यात वाद झाला असता, आरोपींनी वासुदेव यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. मोबाईलचे व्हॉटस्पॉट दिले नाही म्हणून झालेल्या वादातून वासुदेव कुलकर्णी यांची हत्या (Pune Crime News) करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर, काही तासांत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.  


वासुदेव यांचा चेहरा विचित्र झाला होता. ते रक्ताच्या थारोळ्यात (Pune Crime News) फुटपाथवर पडले होते. एका व्यक्तीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वासुदेव यांच्या मोबाईलवरून त्यांच्या घरी फोन केला. उपचारासाठी वासुदेव यांना ससून रुग्णालयान दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.