Vaishnavi Hagavane death case : पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेचा जेसीबी जप्त केला आहे. प्रशांत येळवंडे यांची शशांक आणि आई लता हगवणेने जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती. अॅडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेलं 11 लाख 70 हजार रुपये हगवणेनी परत केले नाहीत. उलट पिस्तूलाचा धाक दाखवून 'आता पैसे मागू नकोस, अन्यथा घरचे नीट राहणार नाहीत.' अशी धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली होती. हा गुन्हा म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर पोलिसांनी हगवणेच्या घरापासून जेसीबी जप्त केलाय.
नेमकं प्रकरण काय?
शशांक हगवणेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वैष्णवीचा पैशांसाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणेंना कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता शशांक हगवणेने जेसीबी व्यवहारप्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप खेड तालुक्यातील प्रशांत येळवंडे यांनी केला आहे. याप्रकरणी महाळुंगे चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शशांक आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रशांत येळवंडे यांनी तक्रारीत नमूद केले की, लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यासोबत 24 लाखांमध्ये जेसीबीचा व्यवहार ठरला होता. त्यामुळे प्रशांत एळवंडे यांनी शशांकला सुरुवातीला 5 लाख रुपये दिले. तसेच जेसीबीवर 19 लाखांचे कर्ज असल्याने प्रशांत बँकेचे हफ्ते भरण्यासाठी महिन्याला 50 हजार रुपये शशांकला देत होते. मात्र शशांकने हफ्ता भरला नाही, ते पैसे मात्र स्वत:साठी वापरले, त्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला. त्यानंतर शशांकने हा जेसीबी सोडवून आणला. मात्र त्यावेळी प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत आणि जेसीबीचा ताबाही दिला नाही. परतव्याची रक्कम 11 लाख 70 हजार रुपये इतकी आहे. शशांक याने आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावले असल्याचा आरोप प्रशांत एळवंडे यांनी केला आहे.
प्रशांत येळवंडे शशांक हगवणेने दिली होती धमकी
प्रशांत येळवंडे एकदा चर्चा करण्यासाठी गेले तेव्हा शशांकने त्याच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलवर हात ठेवून प्रशांत यांना धमकी दिली. "तू मशीन 14 महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको, नाही तर घरचे नीट राहणार नाहीत' असे शशांकने धमकावले. वारंवार मागणी करुन आपली जेसीबी परत न मिळाल्याने प्रशांत यांनी पोलिसांत धाव घेतली.
महत्वाच्या बातम्या: