मावळ, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray)  गटाची यादी जाहीर झाली आहे. यात राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात मावळ (Maval Loksabha) लोकसभेकडून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना (Sanjog Waghere)  उतरवलं आहे. 


मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. मावळमध्ये धनुष्यबाण चिन्हाला मत द्या, असं आवाहन काल (26 मार्च) अजित पवारांनी पत्रकार परिषदेत केलं मात्र उमेदवाराचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. येत्या 28 मार्चला महायुतीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. असं असलं तरीही श्रीरंग बारणे यांना मायुतीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी तगडी लढत पाहायला मिळणार आहे. 


संजोग वाघेरे कोण आहेत?



  • माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत. 

  • संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत.

  • पिंपरी-चिंचवडचे महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय.

  • त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या.

  • स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहे.

  • संजोग वाघेरे राष्ट्रवादीचे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत.

  • शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं.

  • डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेतला होता. 

  • सध्या मावळ लोकसभेचे ठाकरे गटाचे ते संघटक आहेत. 


कोणत्या मुद्यावर सर्वाधिक लक्ष-


शिक्षण, कामगार, शेतकरी, विकास या सगळ्यांमुद्यांवर ते निवडणूक लढवणार आहेत. मावळ मतदार संघाची भौगोलिक रचना पाहिली तर हा मतदारसंघ पर्यटनासाठीदेखील उत्तम आहे आणि इंडस्ट्रीसाठीदेखील उत्तम परिसरत आहे. या सगळ्या मुद्द्यांना लक्ष करुन निवडणूक लढवणार आहेत, असं वाघेरेंनी सांगितलं आहे. 



ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात? 






 

इतर महत्वाची बातमी-