Uddhav Thackrey: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पार पडत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रिडा या ठिकाणी हा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित आहेत. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील पूरस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.
आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यातील कामांना स्टे दिला होता. तो स्टे यांनी काढला, त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा हा विकास नाही विखार आहे अशा शब्दांत ठाकरेंनी (Uddhav Thackrey) हल्लाबोल केला आहे.
पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा यांचा प्रयत्न आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे. ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं. तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प करतोय. तो देखील गुजरातचा होता. पुणेकरांनी यासाठी रस्त्यावर उतरायला हवे, असंही यावेळी उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) म्हटलं आहे.
आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता यांनी तो स्टे काढला
सत्तेत होतो तेव्हा मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. तो स्टे यांनी काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे. म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, अंसही ठाकरे (Uddhav Thackrey) यावेळी म्हणालेत.
'अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा'
"अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा आले होते. पुण्यात येऊन भाषण करुन गेले. त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबु नायडु, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
''माझ्या पायाशी कलिंगड ठेवलंय, पण मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही''
आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. पण, ढेकणांना आवाहन द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं. मी आवाहन द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. तर हे आवाहन चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. तसेच, मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे, मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष, असे म्हणत भाजपवरही निशाणा साधला.