सांगली : आपल्या प्रेयसीला भेटवस्तू देण्यासाठी आणि तिला खुश ठेवण्यासाठी चोरी, घरफोडी करत असलेल्या एका अट्टल चोरट्यास इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. इस्लामपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अट्टल चोरटा जेरबंद झाला आहे. इस्लामपुरचे पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. कुणाल संजय शिर्के असे प्रेमवीर सराईत चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 82 हजारांची रोकड जप्त केली आहे.


पोलिसांनी चोरट्यास बंगळुरू महामार्गवर फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले गेले. विशेष आणि आश्चयाची गोष्ट म्हणजे, हा चोरटा चोरी केल्यानंतर प्रेयसीला चोरी केलेला सेल्फी किंवा चोरीच्या ठिकाणचा सेल्फी पाठवत होता. या प्रेमवीरावर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.


पाहा व्हिडीओ : पक्षाची बदनामी होत असल्याने भाजपच्या माजी आमदारांचा सर्व पदांचा राजीनामा



प्रेयसीला खूश करण्यासाठी घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारला इस्लामपूर पोलिसांच्या सतर्क गस्त पथकाने पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इस्लामपूर शहरात 7 घरफोड्या केल्याचे आणि अन्य ठिकाणीही मोठा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. चोरी केल्यानंतर प्रेयसीला हा चोरटा चोरीच्या ठिकाणाचा सेल्फी पाठवत असे. पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलेल्या कुणाल संजय शिर्के या सराईत चोरट्याकडून आतापर्यंत शहरातील 7 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. प्रेयसीला खूश करण्यासाठी तो या घरफोड्या करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरी केलेला बराच मुद्देमालही लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले आहे.


रविवारी पहाटे शहरात पेट्रोलिंग करणारे पोलीस कॉन्स्टेबल किरण मस्के आणि आलमगीर लतीफ यांनी पाठलाग करीत मोटारसायकलवरून पलायन करणाऱ्या शिर्के याला ताब्यात घेतले होते. त्याने कामेरी येथे घरफोडी करून आल्याची कबुली पोलिसांना दिली होती. अधिक चौकशीत त्याने इस्लामपूर शहरात 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील मिरज, सलगरे, कवठेमहांकाळ येथेही त्याने घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीचा मुद्देमाल त्याने कुठे विकला, याचाही तपास सुरू असल्याचे उपअधिक्षक पिंगळे आणि निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. त्याच्याकडून कामेरी येथे केलेल्या घरफोडीतील 82 हजार रुपयांची रोकड, घरफोडीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. इतर घरफोड्यातील मुद्देमालही लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.


महत्त्वाच्या बातम्या : 


सायकलपटूंचा सांगली ते कन्याकुमारी प्रवास; 'SAY NO TO PLASTIC' आणि 'सायकल चालवा फिट रहा' संदेश


सांगली शहरात नववर्षाची सुरुवात तोडफोड, जाळपोळीने; दोघांना अटक


सांगली महापालिकेच्या महापौर- उपमहापौर पदावर पुन्हा भाजपचंच वर्चस्व