Tourist Points Near Pune : तुम्हीही कुठे तरी फिरण्याचा (Pune) प्लॅन करत असाल तर यावेळी पुण्याला जाण्याचा प्लॅन करा. कारण पुण्यापासून अनेक पर्यटन स्थळ जवळ आहेत आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद देणारेदेखील आहेत. त्यामुळे लाँग वीकेंडमध्ये निसर्ग, थंडी आणि खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर अनेकजण पुण्याची निवड करतात. पुण्याच्या आजूबाजूच्या पर्वतरागा अनेक ट्रेकर्सला आकर्षित करते तर खाद्यसंस्कृती खवय्यांना आकर्षित करते. त्यामुळे झटपट ट्रिप प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स सांगणार आहोत. 


कामशेत  (Kamshet)


सध्या अनेकजण इंस्टा रिल्स तयार करण्यासाठी भटकंती करताना दिसतात. जर तुम्हाला सुंदर आणि अॅडव्हेचर असणारं रिल तायर करायचं असेल तर तुम्ही कामशेतला जाऊ शकता. कामशेत हे महाराष्ट्राचे पॅराग्लायडिंग हब म्हणून ओळखले जाते.  अनेक पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी कामशेतला येत असतात. पुण्यापासून 48किमी अंतरावर आहे. हे लोणावळ्यापासून अगदी जवळ आहे. प्राचीन पर्वत, किल्ले वगैरे इथे पाहायला मिळतात. येथे कोंडेश्वर मंदिर, विदेशेश्वर मंदिर, कार्ला, भाजा गुहा इ. मंदिरेही पाहता येतात.


वाई (wai)


वाई हे कृष्णा नदीजवळ वसलेले अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. पुण्यापासून 85 किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला शांतता अनुभवायला मिळेल. सगळीकडे हिरवळ पाहून मन प्रसन्न होईल. शिवाय पुणे ते वाई प्रवास करत असताना तुमची चांगली रोड ट्रिपदेखील होईल. कारण वाई ते पुण्याचा रस्ता घाटातून जातो या घाटाचादेखील तुम्ही आनंद घेऊ शकता. 



खंडाळा (khandala)


खंडाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक मानलं जातं. पुण्यापासून 69 किमी अंतरावर आहे. 'टायगर लीप' नावाचे व्हिज्युअल स्पॉट आहे. शिवाय खंडाळ्यात फिरण्यासारखेदेखील अनेक स्पॉट्स आहेत. पर्यटन खंडाळ्यातील धुकं पाहून निसर्गाचा आनंद लुटताना दिसत असतात. 


लोणावळा  (lonavala)


मुंबई आणि पुणे अवघ्या काही किलोमीटर अंतरावर लोणावळा सगळ्यांचं आवडतं ठिकाण आहे. लोणावळ्याजवळ अनेक स्पॉट्स आहेत जिथं तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट शिवाय चांगले रिसॉर्ट्सदेखील आहे. मात्र लोणावळ्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जात असाल तर सर्वात आधी राहण्याची सोय पाहून जा. नवं वर्ष साजरं करण्यासाठी लोणावळ्यात देशभरातून लोक येत असतात. त्यामुळे हॉटेल्स बूक असतात. हॉटेल्सच्या बुकींग्स पाहूनच लोणावळ्याला जा आणि ट्रिप एन्जॉय करा. 


इतर महत्वाची बातमी-


Offline Google Map Save : सुट्यांमध्ये फिरायला जाताय? नेटवर्क नसल्याने रस्ता चुकू शकता, आताच या स्टेप्स वापरुन Offline Google Map सेव्ह करा!