बारामती : लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांसमोर देखील आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घुंगराचा छनछनाट, डोलकीचा ताल अन् टाळ मृदुंगाचा नाद हा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांवर ती उपासमारीची वेळ आली. अशीच वेळ लावणी सादर करणाऱ्या कलावंतांवरही आलेली आहे.


राज्यभरात असंख्य कला केंद्र आहेत. या कला केंद्रांवर कलाकार लावण्या सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करतात. घुंगरांचा छनछनाट अन् टाळ-मृदुंगाचा नाद कानी पडल्यानंतर अनेक रसिक यात मंत्रमुग्ध होऊन जातात. पण कोरोनाच्या संकटामुळे हे सर्व कला केंद्र बंद आहेत. दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले न्यू अंबिका कला केंद्र येथेही अशीच अवस्था आहे. नेहमी गजबजलेलं व टाळ-मृदुंगाचा व घुंगराच्या नेहमी या ठिकाणी आवाज येत असतो. मात्र, सध्या या ठिकाणी शांतता पसरलेली आहे. पोटासाठी नाचताना कशाचाही परवा न करणाऱ्या कलाकारांचा आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या लावणीतून 'पोटासाठी नाचते मी परवा कुणाची' असं म्हणणाऱ्या लावणी कलाकारांची आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


नात्याने झिडकारलं, परक्याने स्वीकारलं; कोलकाताहून परतलेल्या पुण्यातील तरुणीचं सांगलीतील अनोळखी कुटुंबासोबत वास्तव्य


लावणी कलाकारांवर उपासमारीची वेळ
दौंड तालुक्यातील प्रसिद्ध लावणी कला केंद्र न्यू अंबिका कला केंद्र हे गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. राज्यातील इतर कला केंद्रांची हीच अवस्था आहे. न्यू अंबिका कला केंद्र याठिकाणी दोनशेहून अधिक कलाकार काम करीत असतात. लॉकडाऊनमुळे येथील सर्व कलाकारांनी घरचा रस्ता धरला होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नाच गाण्याचा मार्ग स्वीकारलेल्या या कलावंतांना आता उपासमारीची वेळ येते की काय असे समस्या उभी राहिलेली आहे. राज्यभरातील लावणी कलावंत आपल्या कला केंद्र मालकांना फोन करून केंद्र केव्हा चालू होणार आहेत याची विचारपूस करू लागले आहेत. अगोदरच नोटाबंदीमुळे अडचणीत आलेली कला केंद्र तग धरण्यास सुरुवात होताच कोरोनाच्या महामारीमुळे आता उध्वस्त होतात की काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शासनांच्या नियमांचे पालन करीत हे कला केंद्र सुरू व्हावेत, अशी मागणी न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांनी केले आहे.


शासनाने एकीकडे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही नियम देऊन हे उद्योगधंदे सुरू केलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती तेथील कामगार व मालकांना दिलासा मिळालेला आहे. याच स्वरूपातही जर कलाकेंद्रही सुरू करण्यासाठी काही अटी देऊन मान्यता दिली. तर नक्कीच पोटासाठी नाचणाऱ्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ येणार नाही.


Railway Booking | रेल्वे स्थानकावर 2 ते 3 दिवसांत तिकीटविक्री सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत