Pune Police: पुण्यात मुसळधार  (Pune rain)पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हीच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महिला पोलिसाने (pune police) उत्तम कामगिरी केली आहे. रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये अडकलेला कचरा स्वत: दूर करत नागरिकांना वाट करुन दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसाची कामगिरी बजावत असताना त्यांनी हे सामाजिक भान राखलं. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


पुण्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. संध्याकाळी झालेल्या पावसाने तर पुणेकरांची दैना केली. अनेक नागरिकांना घरी राहण्याचं आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यात वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे सर्व जवान रस्त्यावर नागरिकांची सोय करताना दिसले. त्यातच महिला असूनही घराची जबाबदारी चोख पार पाडत वर्दीचं भान ठेवत या महिला पोलिसाने स्वत: भरपावसात रस्त्याच्या मधोमध उभं राहून नागरिकांचा खोळंबा होऊ नये त्यांची तारांबळ उडू नये, यासाठी स्वत: पावसात उभं राहून नागरिकांची सेवा करत होत्या.


दोन दिवसांपूर्वी पावसामुळे विमाननगर चौकात प्रचंड प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे परिसरात वाहतून कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याच वेळी वाहतूक पोलिसांनी चेंबरमध्ये पाणी जाण्यासाठी सोय नव्हती. त्यात कचरा अडकल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच वाहतूक पोलिसाने स्वत: चेंबरमधील कचरा काढून नागरिकांना वाट करुन दिली. त्याचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.


 






महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी तत्पर


नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग कार्यालयांना दिवसभरात 71 कॉल आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली आहे. यामध्ये घर, वस्ती, सोसायटीत पाणी शिरल्याच्या तक्रारी आहेत. शहरात झाडपडीच्या सात घटना घडल्या आहेत. पाणी साचलेल्या ठिकाणी पाणी साचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य ती कार्यवाही केली आहे. शहरात आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रत्येक प्रभाग कार्यालयात चोवीस तास कार्यालय सुरु केले आहे. पावासाचा अंदाज घेऊन नागरिकांसाठी शाळेत राहण्याची सोय देखील करण्यात आली होती. मात्र पावासाचा जोर कमी त्यामुळ नागरिकांचं फार नुकसान झालं नाही.